Goa: संकल्प आमोणकर भाजप सरकारचे खंडणीमंत्री आहेत का?, अमित पाटकर यांचा सवाल
By किशोर कुबल | Updated: February 15, 2024 13:27 IST2024-02-15T13:25:34+5:302024-02-15T13:27:30+5:30
Goa Politics: मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर हे डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे खंडणीमंत्री आहेत का? असा प्रश्न कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यानी केला आहे.

Goa: संकल्प आमोणकर भाजप सरकारचे खंडणीमंत्री आहेत का?, अमित पाटकर यांचा सवाल
पणजी - मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर हे डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे खंडणीमंत्री आहेत का? असा प्रश्न कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यानी केला आहे.
मुरगाव बंदरातून बॉक्साईटच्या वाहतुकी आमदार संकल्प आमोणकर यांनी अडवणुक केल्याच्या प्रसारमाध्यमांच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्षांनी गोव्यातील "खंडणी माफिया" ला प्रोत्साहन दिल्याचा आरोप भाजपवर केला आहे.
मुरगाव पोर्ट ट्रस्टमधील त्यांच्या दादागिरीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी पाटकर यांनी केली आहे.
खंडणीसाठी दादागिरी हे भाजपचे नवे ‘बिज्ञनेस मॉडेल’ आहे, अशी टीका करताना पाटकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष तसेच मुख्यमंत्र्यांच्या मौनाबद्दल संशय व्यक्त केला आहे.
पाटकर यांचे असे म्हणणे आहे की, बॉक्साईटची वाहतूक आमोणकर यांनी दहा दिवसांहून अधिक काळ रोखून धरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने याकडे डोळेझाक केली.