इंडिगोचे गोवा-मुंबई विमान खराब हवामानामुळे ‘मोपा’ला परतले

By किशोर कुबल | Updated: September 8, 2023 18:45 IST2023-09-08T18:45:05+5:302023-09-08T18:45:24+5:30

दुपारी ४ च्या सुमारास हे विमान पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.

IndiGo's Goa-Mumbai flight returned to Mopa due to bad weather | इंडिगोचे गोवा-मुंबई विमान खराब हवामानामुळे ‘मोपा’ला परतले

इंडिगोचे गोवा-मुंबई विमान खराब हवामानामुळे ‘मोपा’ला परतले

 

पणजी : मोपाहून मुंबईला निघालेले इंडिगो एअरलाइन्सचे विमान खराब हवामानामुळे मुंबईहून परत वळवून मोपाला आणावे लागले. मोपा येथे तब्बल दीड तास प्रवाशांना या विमानात बसावे लागल्याने खोळंबा झाला. मुंबईतील हवामान अनुकूल असल्याची खात्री करुन दुपारी ४ वाजता हे विमान पुन्हा मुंबईला रवाना झाले.

मोपा येथील मनोहर इंटरनॅशनल विमानतळ सू त्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी १.१६ वाजता या विमानाने मुंबईला जाण्यासाठी उड्डाण केले. परंतु मुंबईला पोचल्यावर खराब हवामानामुळे ‘लॅंडिंग’ करता आले नाही. काहीवेळ घिरट्या मारुन ते पुन्हा ‘मोपा’ला आणले. सुमारे दीड तास प्रवाशांना विमानात बसून रहावे लागले. दुपारी ४ च्या सुमारास हे विमान पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.

Web Title: IndiGo's Goa-Mumbai flight returned to Mopa due to bad weather