शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ८८ इंच पावसाची नोंद : सरासरीपेक्षा ४८.६ टक्के अधिक पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 16:35 IST

राज्यात १ जून ते आतापर्यंत सरासरी ८८ इंच पावसाची नोंद झाली आहे.

नारायण गावस, पणजी: राज्यात १ जून ते आतापर्यंत सरासरी ८८ इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा सरासरीच्या तुलनेत ४८.६ टक्के अधिक पाऊस झाला आहे. सांगे, वाळपई, फोंडा या केंद्रात सर्वाधिक पाऊस  झाला आहे. राज्यात अजूनही पावसाचा जोर कायम असून सर्वत्र पडझड तसेच दरडी काेसळण्याच्या घटना  घडत आहेत.

राज्यात यावर्षी जून ३ पासून पावसाला सुरुवात झाली होती. या नंतर पाऊस सुरुचा आहे. पण जुलै महिन्यापासून पावसाचा  जोर जास्त  वाढला त्यामुळे  सरासरीपेक्षा  जास्त पाऊस यंदा झाला आहे. पुढील दाेन दिवस राज्य हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहेत. 

पडझडीच्या घटना सुरुच- 

फोतार्डा तळसण झर येथे घर पडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. डिचाेली बायपास रस्त्यावर झाड कोसळले, चोर्ला घाटात रस्ता खचला इतर काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या.  मळा पणजी नेवगीनगर येथे समुद्राचे पाणी दुकानात शिरल्याने दुकानांचे नुकसान झाले. तसेच अन्य विविध लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.

धरणे भरली नद्यांची पातळी वाढली-

राज्यातील सर्व धरणे भरली असल्याने पाण्याचा विसर्ग  केला आहे. अंजूणे धरणातून पाण्याचा विसर्ग केला. तसेच तिळारीतून पाणी सोडण्यात आले.  तसेच आमठाणे व इतर धरणही १०० टक्के भरली आहे. यंदा  प्रथमच जुलै महिन्याचा १५ दिवसात सर्व धरणे भरली आहेत. तसेच राज्यातील सर्व नद्यांची पाण्याची पातळीही वाढली आहे.

टॅग्स :goaगोवाRainपाऊस