शहरं
Join us  
Trending Stories
1
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
2
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
3
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
4
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
5
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
6
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
7
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
8
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
9
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला
10
भारीच! कोणत्याही भाषेतील रील आता हिंदीमध्ये डब करता येणार! इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेम-चेंजर AI फिचर
11
नवीन मालकाच्या अपघाताचा ४ लाखांचा भुर्दंड जुन्या मालकाला! गाडी विकताना तुम्ही तर 'ही' चूक केली नाही ना?
12
एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी ९ महिन्यांची प्रेग्नेंट
13
कवडीच्या भावात मिळतोय ५५ इंच 4K एलईडी स्मार्ट टीव्ही, ऑफर पाहून व्हाल खूश!
14
IND vs WI: दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी, जुना विक्रम मोडला!
15
स्वप्न शास्त्र: स्वप्नात सुंदर महिला दिसणे हे कसले संकेत? नशीब फळफळणार की गोत्यात येणार?
16
"आम्हालाही अशा तंत्रज्ञानाची गरज," 'या' भारतीय अ‍ॅपचे फॅन झाले ब्रिटनचे पंतप्रधान
17
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
18
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! उरलेला चहा पुन्हा गरम करून पिता? आताच बदला सवय, अन्यथा...
19
"प्रत्येक सनातनीला माझा संदेश...", राकेश किशोर यांच्याजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली
20
आरोग्य विमा की मेडीक्लेम? गंभीर आजार, ओपीडी आणि मॅटर्निटी कव्हरेज कशात मिळते, दोन्हीत किती फरक?

दूध उत्पादकांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 07:27 IST

खात्याला सूचना : भारतीय किसान संघ, दूध उत्पादक संघटनेने घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दूध उत्पादक तसेच शेतकऱ्यांनी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन विविध मागण्या त्यांच्याकडे मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी मागण्या तत्त्वतः मान्य करून त्वरित अंमलबजावणी करण्याची सूचना पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. नितीन नाईक व अन्य अधिकाऱ्यांना केल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.

भारतीय किसान संघ आणि दूध उत्पादक उत्कर्ष संघटना यांच्या कार्यकर्त्यानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिष्टमंडळातभारतीय किसान संघाचे अध्यक्ष संजीव कुंकळयेकर, श्रीरंग जांभळे, पांडुरंग पाटील, कृष्णनाथ देसाई व दूध उत्पादकांच्या संघटनेचे शिवानंद बाक्रे व इतर उपस्थित होते.

प्रमुख मागण्या...

गेले दीड वर्ष प्रलंबित असलेली कामधेनू योजनेतील त्रुटी दूर करून नव्याने सुरू करावी, गायींच्या खरेदी किमतीत भरीव वाढ करावी, दुधाची आधारभूत किंमत दर महिन्याला नियमितपणे द्यावी, वासरांच्या संगोपनासाठी असलेली मदत दर महिन्याला वेळेवर द्यावी, औषधांचा तसेच मिनरल मिक्स्चर यांचापुरवठा मुबलक आणि खंड न पडता करावा, लसीकरण वेळोवेळी करावे, शेती उत्पादनासंबंधित आधारभूत किमती लवकर मिळावा, शेती अवजारांच्या खरेदी बाबतीत मिळणाऱ्या सबसिडी लवकर दिल्या जाव्यात, सुपारीवर फवारणीसाठी मिळणाऱ्या सबसिडी बाजार किमतीच्या प्रमाणे वाढवाव्यात, जंगली जनावरांच्या उपद्रवांमुळे होणारी नुकसान भरपाई लवकर मिळावी व सेंद्रिय शेतीसाठी असलेल्या सुविधा व सवलती मिळाव्यात या प्रमुख मागण्या होत्या व मुख्यमंत्र्यांनी त्या मान्य केल्या असल्याचे सांगण्यात आले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Implement Milk Producers' Demands: Chief Minister Pramod Sawant

Web Summary : Chief Minister Pramod Sawant met with milk producers and farmers, approving their demands. He instructed officials to promptly implement schemes like Kamdhenu, increase cow purchase prices, ensure timely subsidies, and address wildlife damage compensation.
टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत