आगामी विधानसभा निवडणूक मी फोंड्यातून कुठूनही लढणार : दीपक ढवळीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 07:46 IST2025-12-29T07:46:03+5:302025-12-29T07:46:31+5:30
मगो २०२७ मध्ये भाजपसोबतच राहणार हे अंतिम आहे.

आगामी विधानसभा निवडणूक मी फोंड्यातून कुठूनही लढणार : दीपक ढवळीकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत फोंडा तालुक्यातील कुठल्याही मतदारसंघातून मी निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले. मात्र, माझा हा निर्णय युतीच्या गणितावर आणि आरक्षणाच्या स्थितीवर अवलंबून असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप कार्यालयात काल, रविवारी पत्रकारांशी बोलताना ढवळीकर म्हणाले की, मगो २०२७ मध्ये भाजपसोबतच राहणार हे अंतिम आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत युतीचा फायदा झाल्याचे ढवळीकरांनी सांगितले. तसेच उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पदावर मगोचा कोणताही दावा नाही, असे त्यांनी सांगितले.
त्यांचा मगोशी संबंध नाही...
दक्षिण गोव्यात युतीला जागा मिळवून देण्यात मगोचा निर्णायक वाटा आहे, असे सांगत ढवळीकर यांनी फोंडा पोटनिवडणुकीत रितेश नाईक यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणाही केली. मगोमधून बाहेर पडलेले डॉ. भाटीकर निवडणूक लढवतील का? या प्रश्नावर ढवळीकरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे; मगोचा त्याच्याशी संबंध नाही.