शहरं
Join us  
Trending Stories
1
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
2
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
3
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
4
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला
5
अबब! ही तर फक्त सुरुवात...पारा आणखी 3 ते 4 अंशांनी वाढणार, IMDचा इशारा
6
बापरे एवढी बेरोजगारी! IIT च्या ७००० विद्यार्थ्यांना नोकरी मिळेना; मुंबई, दिल्लीचे माजी विद्यार्थांना साकडे
7
फ्लाइटला ८ तास उशीर, क्रू नसल्याने विमानच उडालं नाही! अक्षया नाईक संतापली, म्हणाली- "लहान मुलं, वयोवृद्ध माणसं..."
8
'या' ३१ जागांवर 'अबकी बार ४०० पार'चं भवितव्य; UP मध्ये भाजपाचा खेळ बिघडणार?
9
Video: पती घरी येताच पत्नीने लाथाबुक्क्यांनी सुरु केली मारहाण, सीसीटीव्ही फुटेज होतेय व्हायरल
10
“स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब, खरे गांधीवादी असते तर...”; रोहित पवारांची अण्णा हजारेंवर टीका
11
"संविधान धर्माच्या नावावर आरक्षण देत नाही, मुस्लिम आरक्षण संपवणार", अमित शाह स्पष्टच बोलले
12
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
13
Rajnath Singh : चांदीचा मुकुट घालताच राजनाथ सिंह म्हणाले, "हा विकून गरिबाच्या मुलीसाठी पैंजण बनवा"
14
हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ? पत्नी नताशासोबत दुरावा, अभिनेत्रीने केलं असं काही.... 
15
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
16
"RCB तून बाहेर पड आणि दिल्लीकडून खेळ मग...", दिग्गजाचा Virat Kohli ला सल्ला!
17
बांग्लादेशी खासदाराची कोलकात्यात निर्घृण हत्या; जवळच्या मित्रानेच दिली 5 कोटींची सुपारी
18
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
19
CSK ला हरवलं म्हणजे IPL ट्रॉफी जिंकली, असं होत नाही; माजी खेळाडूचा RCB ला टोमणा
20
'श्रीवल्ली' येतेय सर्वांना तिच्या तालावर नाचवायला, 'पुष्पा 2' मधील रश्मिकाच्या गाण्याची झलक बघाच

मी भाजपाविषयी भावनिक झालोय : पार्सेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 1:33 PM

मी 30 वर्षे भारतीय जनता पक्षासाठी काम केले आहे. मी भाजपविषयी भावनिक झालेलो आहे.

पणजी : मी 30 वर्षे भारतीय जनता पक्षासाठी काम केले आहे. मी भाजपविषयी भावनिक झालेलो आहे. मी हा पक्ष सोडू शकत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ भाजप नेते व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी लोकमतपाशी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दयानंद सोपटे यांना काँग्रेसमधून आणले व भाजप त्यांना विधानसभेच्या पोटनिवडणुकीला तिकीट देत आहे याची जाणीव झाल्यानंतर पार्सेकर यांनी गेले काही महिने भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांना टीकेचे लक्ष्य बनविले होते. पार्सेकर यांनी आपण प्रसंगी अपक्ष लढेन अशा प्रकारचे संकेत आपल्या कार्यकत्र्याना दिले होते. भाजपच्या मांद्रेतील बहुतेक कार्यकत्र्याना आपल्यासोबत ठेवण्यातही पार्सेकर यांना यश आले होते. तथापि, ते भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध मांद्रेत पोटनिवडणूक लढवतीलच अशी हवा निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर पार्सेकर यांनी आता नरमाईचे धोरण स्वीकारले आहे.

पार्सेकर म्हणाले, की आम्ही भाजपचे काम करताना अनेक खस्ता खाल्ल्या. अनेक चांगले वाईट अनुभव घेतले. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार दुस-यांदा अधिकारावर यायला हवे असा उदात्त हेतू मी आता समोर ठेवला आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांना समजावीन. भाजप सोडणे माझ्यासाठी कठीण आहे, कारण माझी सगळी कारकीर्द याच पक्षात घडली.सोपटे यांना काँग्रेसमधून भाजपामध्ये आणण्याची चूक ही एका व्यक्तीने केली आहे. एक व्यक्ती चुकीच्या पदावर बसली आहे व त्या व्यक्तीने ती चूक केली. त्यासाठी मी पूर्ण पक्षाला कधीच दोष दिला नाही व आताही देत नाही. मी भाजपासोबतच राहीन. पक्षाने माझ्यावर उमेदवार निवड समितीचे एक सदस्य म्हणूनही जबाबदारी दिली आहे. 

टॅग्स :goaगोवा