शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

महिला वाचवताहेत पती, मुलाचा जीव

By admin | Updated: June 20, 2014 02:42 IST

सद्गुरू पाटील ल्ल पणजी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) किडनी रोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी ठरण्याची मालिका अजूनही सुरूच आहे.

सद्गुरू पाटील ल्ल पणजी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) किडनी रोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी ठरण्याची मालिका अजूनही सुरूच आहे. राज्यातील अनेक महिला कधी आपल्या मुलाला तर कधी पतीला वाचविण्यासाठी किडनी दान करण्यास पुढे येतात. गोमेकॉ इस्पितळात आतापर्यंत किडनी रोपणाच्या आठ शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या आहेत. आठपैकी बहुतांश प्रकरणी महिलांनीच आपली प्रत्येकी एक किडनी देऊन पुरुषास जीवनदान दिले आहे. किडनी रोपण शस्त्रक्रियेसाठी अगोदर मुंबईहून तज्ज्ञ डॉक्टारांना गोमेकॉ इस्पितळात आणावे लागत होते. त्यांच्या मार्गदर्र्शनाखाली गोमेकॉतील डॉक्टरांचे पथक शस्त्रक्रिया करत होते. आता गोमेकॉतील डॉ. मधुमोहन प्रभुदेसाई व अन्य डॉक्टर्स मिळून किडनी रोपण यशस्वी करत आहेत. दोन तासांपेक्षा जास्त वेळ ही शस्त्रक्रिया चालते. एखादी व्यक्ती किडनी दुसऱ्यास दान करण्यासाठी तयार झाल्यानंतर कायदेशीर दृष्टिकोनातूनही काही सोपस्कार पार पाडावे लागतात. आता आणखी तीन व्यक्ती किडनी दान करण्यासाठी तयार झालेल्या आहेत. या प्रतिनिधीला डॉ. प्रभुदेसाई यांनी सांगितले, की गोमेकॉत येत्या महिन्यात किडनी रोपणाच्या आणखी तीन शस्त्रक्रिया पार पडणार आहेत. तीन व्यक्तींपैकी दोन महिला आहेत. या दोन महिलांनी पुरुषांचे जीव वाचविण्यासाठी आपली एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे सगळे सोपस्कार पूर्ण झाले आहेत.