भाजयुमोतर्फे गरजूंना घरे; मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 10:32 IST2023-04-24T10:31:57+5:302023-04-24T10:32:38+5:30

डिचोलीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पायाभरणी

houses for the needy by bjp chief minister birthday activities | भाजयुमोतर्फे गरजूंना घरे; मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित उपक्रम

भाजयुमोतर्फे गरजूंना घरे; मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित सेवा, सुशासन व गरीब कल्याण या संकल्पनेंतर्गत भाजप युवा मोर्चा चार मतदारसंघांमध्ये गरजू लोकांना मोफत घरांचे बांधकाम करून देणार असल्याची माहिती मोर्चाचे अध्यक्ष समीर मांद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

डिचोली, गावकरवाडा येथील सदा मांद्रेकर, हसापूर पेडणे येथील विजया मळीक, काणकोण येथील दिलखुश रायकर व सांगे येथील गणेश रायकर यांच्या घरांचा यात समावेश आहे. त्यापैकी सदा मांद्रेकर यांच्या घराच्या पायाभरणीसाठी मुख्यमंत्री हे खुद्द उपस्थित राहतील असे त्यांनी सांगितले.

मोर्चाचे पदाधिकारी अखिल पर्रीकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित राज्यातील सर्व ४० ही मतदारसंघातील सरकारी प्राथमिक शाळांतील सुमारे १० विद्यार्थ्यांना गणवेश कापडांचे वितरण केले जाईल. तसेच प्रत्येक मतदारसंघातील २५ गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप, अनाथाश्रमात जाऊन भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा करणे, राज्यभरात दोन हजार रोपट्यांचे वितरण करणे आदी उपक्रम राबवणार आहे.

याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित तयार केलेल्या वाळू शिल्पासोबत सेल्फी स्पर्धेचेही आयोजन केले आहे. या स्पर्धेतील विजेता हा सदर सेल्फीला इन्स्टाग्रामवर मिळणाऱ्या सर्वाधिक लाईक्सवर ठरेल असे त्यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे नेते दामू नाईक व अन्य पदाधिकारी हजर होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: houses for the needy by bjp chief minister birthday activities