हॉटेल उद्योग 'गॅस'वर; सिलिंडर पुरवठ्याअभावी व्यावसायिकांची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 09:23 IST2026-03-19T09:23:54+5:302026-03-19T09:23:54+5:30

राज्यातील बहुतांश शहरांत स्वीगी, झोमॅटो, ब्लिंकीट यांसह विविध अॅप आधारित सेवेतून हॉटेल्समधील खाद्यपदार्थाची डिलिव्हरी केली जाते. मात्र, हॉटेल्स बंद असल्याचा फटका या सेवेला बसला आहे.

hotel industry on gas businessmen in dilemma due to lack of cylinder supply in goa | हॉटेल उद्योग 'गॅस'वर; सिलिंडर पुरवठ्याअभावी व्यावसायिकांची कोंडी

हॉटेल उद्योग 'गॅस'वर; सिलिंडर पुरवठ्याअभावी व्यावसायिकांची कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे व्यावसायिक एलपीजीच्या वितरणावर केंद्र सरकारने निर्बंध आणल्याने अनेक रेस्टॉरंट आणि हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आली आहे. परिणामी, राज्याच्या पर्यटनाला फटका बसू लागला असून, गेल्या काही दिवसांत पर्यटकांकडून होणारे हॉटेल्सच्या बुकिंगमध्ये ५० टक्के घट झाली आहे.

व्यावसायिक सिलिंडरच्या वितरणावरील बंदीमुळे राज्यातील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्सचा व्यवसाय सध्या डळमळीत झाला आहे. सिलिंडरच नसल्याने स्वयंपाक, नाश्ता बनविणार कसा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे शहरासह राज्यभरात ठिकठिकाणी सुमारे २० ते २५ टक्के रेस्टॉरंट्स, हॉटेल्स बंद असल्याचेही दिसून येत आहेत. काही जणांनी सिलिंडर मिळाला की हॉटेल सुरू होईल, असे नेहमीच्या ग्राहकांना सांगितले आहे.

याबाबत, गोवा हॉटेल्स अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष गौरीश धोंड म्हणाले की, आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजीबाबत ही स्थिती निर्माण झाली आहे, हे मान्य. मात्र, पर्यटन उद्योग हा गोव्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. त्यामुळे याचा थेट फटका पर्यटन उद्योगावर होऊ लागला आहे. स्थानिक लोक घरी चहा, नाश्ता, जेवण जेवू शकतात. मात्र, पर्यटकांचे तसे नाही. ते चहा, नाश्ता, जेवण यासाठी हॉटेल व रेस्टॉरंट्सवर अवलंबून असतात. त्यांना आता अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सिलिंडर सुरू होताहेत रेस्टॉरंट्स मिळाल्यावरच

अनेक हॉटेल्स, तसेच रेस्टॉरंट्सनी आपल्या मेन्यूमध्ये कपात केली आहे. कमीतकमी सिलिंडरचा वापर होऊ शकेल, असे पदार्थ निवडले जात आहेत. काही जण सिलिंडर उपलब्ध झाल्यानंतर ठरावीक वेळेसाठीच हॉटेल्स खुली करीत आहेत. त्यामुळे आता पर्यटकही गोव्यात येताना या गोष्टी ध्यानात ठेवत आहेत. त्यामुळे जवळपास ५० टक्के पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द केल्याचे धोंड यांनी सांगितले.

फूड डिलिव्हरी अॅपवरून बुकिंग झाली बंद

राज्यातील बहुतांश शहरांत स्वीगी, झोमॅटो, ब्लिंकीट यांसह विविध अॅप आधारित सेवेतून हॉटेल्समधील खाद्यपदार्थाची डिलिव्हरी केली जाते. मात्र, हॉटेल्स बंद असल्याचा फटका या सेवेला बसला आहे. अनेक हॉटेल्सकडून सध्या ऑर्डर स्वीकरले जात नसल्याचा मेसेज या अॅप्सवर येत आहे. त्यामुळे पर्यटक तसेच हॉटेल, रेस्टॉरंट्समधील खाद्यपदार्थ मागविणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.
 

 

Web Title : होटल उद्योग हांफ रहा है: सिलेंडर की कमी से गोवा में कारोबार ठप

Web Summary : खाड़ी युद्ध से एलपीजी प्रतिबंधों के कारण गोवा के होटलों को बंद करने का सामना करना पड़ रहा है। पर्यटन को 50% बुकिंग रद्द होने से नुकसान हुआ है। रेस्तरां मेनू कम करते हैं, घंटे सीमित करते हैं। खाद्य वितरण ऐप्स सेवाओं को रोकते हैं, जिससे पर्यटकों और स्थानीय लोगों पर असर पड़ता है।

Web Title : Hotel Industry Gasps: Cylinder Shortage Cripples Businesses in Goa

Web Summary : Goa's hotels face closure due to LPG restrictions from the Gulf war. Tourism suffers with 50% booking cancellations. Restaurants reduce menus, limiting hours. Food delivery apps halt services, impacting tourists and locals.