शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

गोव्यातीस सेक्स स्कॅण्डल प्रकरणी वकिलाच्या अटकपूर्व जामिनावर 11 रोजी सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2017 4:39 PM

मच्छीमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांच्या कथित सेक्स स्कॅण्डलप्रकरणी गोव्याचे एक वकील आणि सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्ज यानी अटकपूर्व जामिन अर्ज मिळविण्यासाठी धाव घेतल्यानंतर त्यांच्या अटकपूर्व जामिनावर उत्तर गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने येत्या 11 रोजी सुनावणी ठेवली आहे.

पणजी - मच्छीमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांच्या कथित सेक्स स्कॅण्डलप्रकरणी गोव्याचे एक वकील आणि सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्ज यानी अटकपूर्व जामिन अर्ज मिळविण्यासाठी धाव घेतल्यानंतर त्यांच्या अटकपूर्व जामिनावर उत्तर गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने येत्या 11 रोजी सुनावणी ठेवली आहे. गेले काही दिवस गोव्यात हे प्रकरण विविध कारणांमुळे व विविध दृष्टीकोनांमधून गाजत आहे.

मंत्री पालयेकर यांच्यावर एका कथित सेक्स स्कॅण्डल प्रकरणी आयरिश रॉड्रीग्ज यांनी आरोप केले होते. पालयेकर हे प्रकरणात गुंतले असल्याचे रॉड्रीग्ज यांनी म्हटले होते व या प्रकरणी एका महिलेचे छायाचित्रही त्यांनी फेसबुकवर अपलोड केले होते. यामुळे चिडून महिलेने, तिच्या पतीने व अन्य काहीजणांनी मिळून रॉड्रीग्ज यांच्या कार्यालयात प्रवेश केला व रॉड्रीग्ज यांच्याशी त्यावेळी बाचाबाची झाली. तसेच रॉड्रीग्ज यांच्या अंगावर शाईही मारण्यात आली. यामुळे रॉड्रीग्ज यांनी आपल्यावर हल्ला झाल्याची तक्रार पोलिसांत केली. तसेच त्या महिलेने आयरिश यांनी आपला

लैंगिकदृष्ट्या छळ केल्याची तक्रार पोलिसांत केली होती. पोलिसांनी आयरिशविरुद्ध एफआयआर नोंद केला.  याच काळात तारा केरकर यांच्या सवेरा नावाच्या महिला संघटनेने आयरिशविरुद्ध निदर्शने केली. आयरिश यांच्याविरुद्ध अनेक गंभीर आरोप तारा केरकर व इतरांनी करून त्यांच्या अटकेची मागणी केली. आयरिश हे महिलांची नाहक बदनामी करतात अशा प्रकारचा प्रमुख आरोप होता. 

अंजुना पोलीस स्थानकाचे निरीक्षक सी. एल. पाटील यांनी आयरिशला समन्स पाठविले व पोलीस स्थानकावर बोलावून घेऊन त्याची जबानी नोंदवून घेतली. आपण कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही किंवा कोणताही कायदा मोडलेला नाही, असे आयरिश यांचे म्हणणे आहे. आपल्या अटकेसाठी मंत्री प्रयत्न करत असल्याचाही त्यांचा दावा आहे. सरकारने हे प्रकरण चौकशीसाठी अंजुना पोलिसांकडून काढून क्राईम ब्रँचकडे तपासासाठी दिले. क्राईम ब्रँचने आयरिश याना समन्स पाठविले. आयरिश यांनी न्यायालयाच्या देखरेखीखाली एखाद्या पोलिस अधिकाऱ्यामार्फत चौकशी काम करून घ्यावे, अशी विनंती न्यायालयास केली होती. त्याबाबत न्यायालयात याचिका प्रलंबित असतानाच क्राईम ब्रँचकडून दोन समन्स पाठविण्यात आल्यानंतर रॉड्रीग्ज यांनी अटकपूर्व जामिनासाठी  गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने क्राईम ब्रँचला नोटीस पाठवून शनिवारी मत विचारले होते. क्राईम ब्रँचने आपले म्हणणो शनिवारी न्यायालयास कळविले. रॉड्रीग्ज यांच्याविरोधात ज्या कलमांखाली गुन्हा नोंद झाला आहे, ती सगळी कलमे जामिनपात्र असल्याचे पोलिस निरीक्षक दत्तगुरु सावंत यांनी स्पष्ट केले. यामुळे आता 11 रोजी सुनावणी होणार आहे.