गोविंद गावडेंचा भाजप बैठकीत आक्रमक पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:59 IST2025-07-16T12:58:41+5:302025-07-16T12:59:25+5:30

पंचायत राजकारणावर विचारला नेत्यांना प्रश्न

govind gaude aggressive stance at bjp meeting | गोविंद गावडेंचा भाजप बैठकीत आक्रमक पवित्रा

गोविंद गावडेंचा भाजप बैठकीत आक्रमक पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : तुम्ही आम्हाला शिस्तीच्या गोष्टी सांगता, मग भाजपच्याच ताब्यातील पंचायत भाजपचेच नेते कसे काय उडवण्याचा जोरदार पण अयशस्वी प्रयत्न करतात, असा थेट प्रश्न आमदार गोविंद गावडे यांनी काल, मंगळवारी पणजीत भाजपच्या बैठकीत उपस्थित केला. या प्रश्नावर मात्र भाजपचे कोणतेच नेते उत्तर देऊ शकले नाहीत.

प्रियोळ मतदारसंघातील बेतकी-खांडोळा ही पंचायत गावडे यांच्याकडे आहे. गोविंद गावडे हे भाजपचेच आमदार व पंचायत भाजपची. पण सरकारमधील नेते मात्र ती पंचायत उडवून तिथे सत्ताबदल करण्यासाठी प्रयत्न करत राहिले. गोविंद गावडे यांनी हाच मुद्दा बैठकीत मांडला व पक्षशिस्त तुमच्याकडूनच कशी काय मोडली जाते? अशी विचारणा बैठकीत केली. सर्व आमदार व मंत्री यावेळी शांत राहिले. गावडे यांनी खेळलेल्या चालीमुळे सरपंच, उपसरपंचाला हटविणे भाजप नेत्यांना शक्य झाले नाही. 

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ता बांधकाम वगैरे निविदांसाठी जो आदेश जारी केला, तो योग्य आहे. पण त्यातून रस्त्यांची कामे निकृष्ट होऊ नये म्हणून कंत्राटदारांनी जास्त अनामत बांधकाम खात्याकडे ठेवायला हवी. केवळ ५ टक्के नव्हे तर जास्त अनामत घेतली तरच रस्त्यांचे काम ठीक होईल, असे काही आमदारांनी सांगितले.

 

Web Title: govind gaude aggressive stance at bjp meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.