शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न, मात्र मी विश्वासघात करणार नाही- विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 20:05 IST

राज्यात सोशल मीडियावरून चाललेला प्रचार, पीडीएच्या विषयावरून आंदोलन करण्याचे होत असलेले निर्णय, गुड फ्रायडेला काही चर्चमधून आंदोलनासाठी बळ देण्याचे झालेले प्रकार अशा विविध अनुभवांच्या पार्श्वभूमीवर नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांना काही घटक सरकार अस्थिर करण्यासाठी सक्रिय झाले असल्याचे वाटत आहे.

पणजी : राज्यात सोशल मीडियावरून चाललेला प्रचार, पीडीएच्या विषयावरून आंदोलन करण्याचे होत असलेले निर्णय, गुड फ्रायडेला काही चर्चमधून आंदोलनासाठी बळ देण्याचे झालेले प्रकार अशा विविध अनुभवांच्या पार्श्वभूमीवर नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांना काही घटक सरकार अस्थिर करण्यासाठी सक्रिय झाले असल्याचे वाटत आहे. मात्र मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेत उपचार घेत असताना आपण त्यांचा विश्वासघात करणार नाही, अशी भूमिका मंत्री सरदेसाई यांनी मंगळवारी येथे मांडली.ग्रेटर पणजी पीडीएमधून ताळगावचाही भाग काढला जावा, अशी मागणी लोकांकडून केली जात असल्याविषयी मंत्री सरदेसाई यांना पत्रकारांनी विचारले असता, सरदेसाई म्हणाले, की ताळगावचा भाग केवळ आताच पीडीएमध्ये आहे असे नाही. तो भाग पूर्वीपासून पीडीएत असून कधीच ताळगावच्या पंचायतीने, सरपंचांनी किंवा ताळगावच्या आमदाराने त्यास आक्षेप घेतला नाही. आता ताळगाव बाहेरील लोक जर तो भाग पीडीएमध्ये नको असे म्हणत असतील तर आपण त्याविषयी बोलू इच्छीत नाही. ताळगावच्या सरपंच व पंचायतीने त्याविषयी बोलावे.मंत्री सरदेसाई म्हणाले, की येत्या 6 एप्रिल रोजी काही जण ग्रेटर पणजी पीडीएविरुद्ध पणजीत मोर्चा काढून व सभा घेऊन आंदोलन करणार आहेत. जे भाग अगोदरच आम्ही ग्रेटर पणजी पीडीएमधून वगळले आहेत, त्या भागांतील लोकांनी आंदोलन करणे हे समजण्यासारखेच नाही. आंदोलनाचा हेतू काय तोच मला कळत नाही. जे भाग ग्रेटर पणजी पीडीएमधून वगळा अशी मागणी सांताक्रूझ, सांतआंद्रेचे लोक करत होते, ते भाग आम्ही बाहेर काढलेच. लोकांची मागणी आम्ही मान्य केली. तरी देखील आंदोलन होत आहे.सरदेसाई म्हणाले, की चर्च संस्थेशी निगडीत काही घटक देखील या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी सक्रिय होतात हे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. येत्या 6 रोजी पीडीएविरुद्ध होणा-या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन गेल्या गुड फ्रायडेला काही चर्चमधून लोकांना केले गेले. यामुळे आपण दुस-याच दिवशी ग्रेटर पणजी पीडीएतून बहुतेक भाग वगळले. आपण तसे करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची देखील मान्यता घेतली नाही. पीडीए चेअरमन बाबूश मोन्सेरात यांच्याशी देखील आपण त्याविषयी तपशीलाने पूर्वी बोललो नाही. मी नंतर आर्चबिशपांशीही चर्चा केली व हे नेमके काय चालले आहे, अशी विचारणा केली. चर्चमधून लोकांना गुड फ्रायडेवेळी पीडीएविरोधी सभेत भाग घेण्याचे आवाहन करण्याचा विषय नेमका काय आहे हे मी आर्चबिशपांना विचारले. बहुतेक भाग आम्ही पीडीएतून काढले असल्याचे मी त्यांना सांगितले.सरदेसाई म्हणाले, की काही जण सरकार अस्थिर करू पाहत असावेत. मी विद्यमान सरकारमध्ये मंत्री असल्याने काही जण वेगळा डाव खेळू पाहत आहेत. सोशल मीडियावरूनही तसाच प्रचार चालतो. धूर येतोय म्हणजे कुठे तरी आग निश्चितच आहे. मात्र मी आगीला घाबरणार नाही. मी पर्रीकर यांचा विश्वासघात करणार नाही. निदान ते इस्पितळात उपचार घेत असताना तरी मला त्यांचा विश्वासघात करणे मान्य नाही.

टॅग्स :goaगोवा