कर्नाटकविरुद्धच्या सामन्यासाठी गोव्याचा रणजी संघ जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 15:54 IST2024-01-16T15:53:50+5:302024-01-16T15:54:29+5:30

या लढतीसाठी फॅलिक्स आलेमावला गोव्याच्या संघात स्थान देण्यात आले आहे.

Goa's Ranji team announced for the match against Karnataka | कर्नाटकविरुद्धच्या सामन्यासाठी गोव्याचा रणजी संघ जाहीर

कर्नाटकविरुद्धच्या सामन्यासाठी गोव्याचा रणजी संघ जाहीर

पणजी: म्हैसूर येथे दिनांक १९ ते २२ जानेवारी या कालावधीत खेळविण्यात येणाऱ्या कर्नाटकविरुद्धच्या चार दिवशीय रणजी चषकसाठी गोवा क्रिकेट संघटनेतर्फे गोव्याचा संघ जाहीर केला आहे. चंदीगढविरुद्धचा सामना संपल्यानंतर संघटनेने संघ घोषित केला. या लढतीसाठी फॅलिक्स आलेमावला गोव्याच्या संघात स्थान देण्यात आले आहे.

संघटनेतर्फे हा एकमेव बदल केला असून, बाकीचा संघ तोच ठेवला आहे. या संघाचे नेतृत्व अष्टपैलू दर्शन मिसाळ याच्याकडे सोपविण्यात आले आहे.

गोव्याचा रणजी संघ याप्रमाणे : इशान गडेकर, मंथन खुटकर, सुयश प्रभुदेसाई, राहुल त्रिपाठी, के. व्ही. सिद्धार्थ, स्नेहल कवठणकर, दर्शन मिसाळ (कप्तान), दिपराज गावकर (उपकप्तान), मोहित रेडकर, समर दुभाषी, अर्जुन तेंडुलकर, वीजेश प्रभुदेसाई, लक्षय गर्ग, हेरंब परब, फॅलिक्स आलेमाव व अमुल्य पांड्रेकर.
 

 

Web Title: Goa's Ranji team announced for the match against Karnataka