शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील अभियंत्यांच्या

By admin | Updated: June 17, 2014 01:48 IST

पणजी : गेले सहा महिने इराणमध्ये अडकलेल्या गोव्यातील दोघा अभियंत्यांच्या सुटकेचा प्रयत्न करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालण्यात आले आहे.

पणजी : गेले सहा महिने इराणमध्ये अडकलेल्या गोव्यातील दोघा अभियंत्यांच्या सुटकेचा प्रयत्न करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालण्यात आले आहे. संबंधित विषय त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी शनिवारी गोवा भेटीवर आले असता, पॉवर इंजिनियर्सचे व्यवस्थापकीय संचालक अतुल काणे यांनी पंतप्रधानांना निवेदन सादर करून या विषयात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पॉवर इंजिनियरिंग इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीचे अभियंते महम्मद हुसेन खान व संकेत दिनेशचंद्र पांडे यांना इराणहून भारतात आणण्यासाठी पुढील दहा दिवसांत प्रयत्न झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा ह्युमन राईटस् डिफेंडर्सचे अध्यक्ष अ‍ॅडविनो फर्नांडिस यांनी दिला आहे. या भारतीय अभियंत्यांना कंपनीतून जनरेटर यंत्रे पोहोचविण्यासाठी दुबई येथील दोन कंपन्यात पाठविण्यात आले होते. त्या कंपनीकडून भारतातून पाठविण्यात आलेली यंत्रे इराणमधील जानजान येथील मेसर्स वझाहर जहान कंपनीला विकण्यात आली. पॉवर इंजिनियरिंग कंपनीकडून ही यंत्रे बसविण्यासाठी अभियंत्यांचा एक गट इराणला पाठविण्यात आला होता. खान व पांडे यांनी त्यांच्या गटाच्या अध्यक्षांना सांगितल्याप्रमाणे भारतातून इराण व इराणहून भारतात ने-आण करण्याची पूर्ण जबाबदारी इराणमधील वझाहर जहान कंपनीची होती. महम्मद खान हा यापूर्वी चार वेळा इराण येथे जाऊन आला होता. तो शेवटचा भारतात आल्यानंतर तेथील क्षुल्लक दर्जाच्या सेवेबाबत व्यवस्थापनाला त्याने तक्रार दिली होती. वझाहर जहान कंपनी व व्यवस्थापन मंडळाने अशी गैरसोय पुन्हा होणार नाही असा विश्वास दिला होता. संकेत व खान हे २३ नोव्हेंबर रोजी एकेरी व्हिसावर २२ डिसेंबरपर्यंत कामासाठी इराणला गेले होते. त्या वेळी त्यांच्या समूहाचे सहकारी व प्रकल्प व्यवस्थापक निलालजान दास गुप्ता तिथे उपस्थित होते. काही दिवसांनंतर समूहातील ५ कर्मचारी भारतात परतले. त्यानंतर ५ डिसेंबर रोजी प्रकल्प अधिकारी दास गुप्ताही भारतात परतले. खान व पांडे यांनी १ जानेवारीला २0१४ रोजी पॉवर इंजिनियरिंगचे व्यवस्थापकीय संचालक अतुल पै काणे व जोस फर्नांडिस यांना कळविले की जोपर्यंत पासपोर्ट व व्हिसा मिळत नाही तोपर्यंत आम्ही तेथील कंपनीस भेट देणार नाही. यानंतर वझाहर जहान कंपनीने दोन्ही इंजिनियर्सची सतावणूक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पॉवर इंजिनियर्सचे वकील समीप यांनी इराण येथे जाऊन कंपनीच्या विविध अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. खान व पांडे यांची मानसिक व शारीरिक स्थिती गंभीर असल्याचे जाणवते, असे फर्नांडिस यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. (प्रतिनिधी)