गोंयकार अजूनही होताहेत 'पोर्तुगीज'; पाच वर्षांत ८,४२५ जणांनी सोडले भारतीय नागरिकत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 09:06 IST2026-03-10T09:04:15+5:302026-03-10T09:06:01+5:30

रोजगार, शिक्षण तसेच चांगल्या संधींच्या शोधात मागील पाच वर्षात ८ हजार ४२५ गोमंतकीयांनी भारतीय नागरिकत्व सोडले.

goans is still portuguese 8 thousand 425 people gave up Indian citizenship in five years | गोंयकार अजूनही होताहेत 'पोर्तुगीज'; पाच वर्षांत ८,४२५ जणांनी सोडले भारतीय नागरिकत्व

गोंयकार अजूनही होताहेत 'पोर्तुगीज'; पाच वर्षांत ८,४२५ जणांनी सोडले भारतीय नागरिकत्व

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: रोजगार, शिक्षण तसेच चांगल्या संधींच्या शोधात मागील पाच वर्षात ८ हजार ४२५ गोमंतकीयांनी भारतीय नागरिकत्व सोडले असून, त्यांनी परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे. मात्र या नागरिकांची मातृभूमीशी असलेली नाळ तुटलेली नाही. त्यामुळे अशा गोमंतकीयांना 'ओव्हरसिज सिटिझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्ड' मिळावे यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सोमवारी विधानसभेच्या शून्य प्रहरात केली.

सरदेसाई म्हणाले की, रोजगार व शिक्षणाच्या संधींसाठी अनेक गोमंतकीयांनी पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारले आहे. मात्र त्यांचे कुटुंब, मालमत्ता आणि भावनिक नाते अजूनही गोव्याशी जोडलेले आहे. त्यामुळे अशा नागरिकांना भारताशी जोडून ठेवण्यासाठी ओसीआय कार्ड देण्याची प्रक्रिया सुलभ करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

सरदेसाई यांनी सांगितले की, पोर्तुगालचे पंतप्रधान आंतोनियो कोस्ता हे मूळ गोमंतकीय आहेत. ते भारत दौऱ्यावर आले असताना त्यांनी स्वतःकडे ओसीआय कार्ड असल्याचे भारताच्या पंतप्रधानांसमोर दाखवले होते.

मात्र पोर्तुगीज पासपोर्ट असलेल्या अनेक गोमंतकीयांना अजूनही ओसीआय कार्ड मिळवण्यात अडथळे येत असल्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

ओसीआय कार्ड म्हणजे काय?

ओव्हरसिज सिटिझन ऑफ इंडिया (ओसीआय) हे भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांसाठी दिले जाणारे विशेष दर्जाचे कार्ड आहे. या कार्डधारकांना भारतामध्ये आयुष्यभरासाठी व्हिसामुक्त प्रवेश मिळतो. भारतात दीर्घकाळ राहणे, शिक्षण घेणे किंवा व्यवसाय करणे यास परवानगी मिळते. मात्र मतदानाचा अधिकार किंवा सार्वजनिक पद धारण करण्याचा अधिकार मिळत नाही. पोर्तुगीज नागरिकत्व घेतलेल्या अनेक गोमंतकीयांसाठी हे कार्ड भारताशी संबंध टिकवून ठेवण्याचा महत्त्वाचा दुवा मानले जाते.

इतर नागरिकांनी युके, कॅनडा, यूएस, जर्मनी, रशिया आणि थायलंड या देशांचे नागरिकत्व घेतले. शिवाय कझाकस्तान, मेक्सिको, फान्स, रोमानिया, टांयानिया आणि पोलंड या देशांचे नागरिकत्वही स्वीकारले आहे. २,२०९ गोमंतकीयांनी २०२४ या वर्षात सर्वाधिक परदेशी नागरिकत्व स्वीकारले.
 

Web Title : गोवावासी अभी भी 'पुर्तगाली'; पांच वर्षों में 8,425 ने भारतीय नागरिकता छोड़ी।

Web Summary : पिछले पांच वर्षों में 8,425 गोवावासियों ने रोजगार और शिक्षा के लिए भारतीय नागरिकता छोड़ दी। विधायक सरदेसाई ने सरकार से उनके लिए ओसीआई कार्ड की सुविधा देने का आग्रह किया, ताकि गोवा से संबंध बना रहे। पुर्तगाल के पीएम भी ओसीआई कार्ड धारक हैं।

Web Title : Goans still 'Portuguese'; 8,425 relinquished Indian citizenship in five years.

Web Summary : Over 8,425 Goans relinquished Indian citizenship in five years, seeking opportunities abroad. MLA Sardesai urges government to facilitate OCI cards for them, maintaining ties with Goa. Portugal's PM, a Goan descendant, also holds an OCI card.