शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

किनारपट्टीपेक्षा गोव्यातील शहरी भागातच गांजाचा अधिक सुळसुळाट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 10:45 AM

मडगाव नंबर एक वर: पणजीचा दुसरा क्रमांक तर फोंडा, वास्को तिसऱ्या स्थानावर

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: गोव्यात अंमली पदार्थाचा व्यवसाय केवळ किनारपट्टी भागातच चालतो या कल्पनेला पूर्ण छेद देणारे चित्र गेल्या साडेआठ महिन्यात पुढे आले असून मडगाव आणि पणजीसारख्या शहरातच नव्हे तर फोंडा व वास्कोसारख्या उपनगरातही अंमलीपदार्थ खुलेआम मिळू लागले आहेत असे दिसून आले आहे. आतार्पयत गोव्यात मागच्या साडेआठ महिन्यात 108 अंमलीपदार्थ संदर्भातील प्रकरणो उघडकीस आली असून त्यापैकी 70 टक्के प्रकरणो ही बिगर किनारपट्टी भागात असल्याचे स्पष्ट झाले आहे.सरसकट भाषेत गांजा आणि गदुल्र्याच्या भाषेत ज्याला ‘ग्रास’ म्हटले जाते अशा प्रकारची एकूण 73 प्रकरणो मागच्या साडेआठ महिन्यात वेगवेगळ्या पोलीस स्थानकात वर्ग झाली असून आतार्पयत पोलिसांनी तब्बल 37 लाखांचा गांजा पकडला आहे. आतार्पयत या ‘ग्रास’ ट्रेडमध्ये असलेल्या 85 जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यात 28 गोमंतकीय, 52 इतर भारतीय तर 5 विदेशी आरोपींचा समावेश आहे.

मागच्या साडेआठ महिन्यांच्या गुन्हेगारी घटनांचा आढावा घेतल्यास मडगावचा रेल्वे स्थानक परिसर, पणजीतील उद्याने, फोंडय़ातील शैक्षणिक आस्थापने आणि औद्योगिक वसाहती तर वास्कोत रेल्वे स्थानक परिसर या भागातच अशाप्रकारचे गुन्हे जास्त नोंद झाले असून मडगावात अशाप्रकारचे एकूण 15, पणजीत 11 तर फोंडा व वास्को या पोलीस स्थानकाच्या कक्षेत एकूण प्रत्येकी सात घटनांची नोंद झाली आहे. कळंगूट पोलीस स्थानकाच्या कक्षेत सहा (ही फक्त गांजा संदर्भातील प्रकरणो असून त्यात सिंथेटीक ड्रग्सच्या प्रक़रणांची नोंद नाही). तर म्हापसा पोलीस स्थानकाच्या कक्षेत चार प्रकरणांची नोंद झाली आहे. औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या कुंकळ्ळी पोलीस स्थानकात तीन, फातोर्डा व कोलवा पोलीस स्थानकाच्या कक्षेत प्रत्येकी तीन, पेडणो, कुळे, काणकोण, वेर्णा, कुडचडे येथे प्रत्येकी दोन तर वाळपई, अंजुणा, ओल्ड गोवा व मायणा-कुडतरी पोलीस स्थानकाच्या कक्षेत एका प्रकरणाची नोंद झाली आहे.

गोव्यातील या वाढत्या ड्रग्स व्यवसायाबद्दल चिंता व्यक्त करताना कुडचडेच्या न्यू एज्युकेशनल हायस्कूलचे व्यवस्थापक प्रदीप काकोडकर म्हणाले, हे अंमलीपदार्थ अगदी  लोकांच्या घरार्पयत पोहोचले असून विद्यालयीन विद्यार्थी या व्यवसायाचे सॉफ्ट टार्गेट बनले आहेत. या अंमली पदार्थाच्या आहारी उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थी जाऊ लागले आहेत. या ड्रग्स व्यावसायिकांना पोलिसांचाही आशिर्वाद असल्यामुळे सगळे काही बिनबोभाटपणो चालू असल्याचे ते म्हणाले.

फोंडय़ात ड्रग्सचा सुळसुळाटमोठय़ा प्रमाणावर शैक्षणिक आस्थापने आणि औद्योगिक वसाहती असलेल्या फोंडय़ात मागच्या काही वर्षात या ड्रग्स व्यवसायाने आपली पाळेमुळे पसरावयाला सुरुवात झाली आहे. 8 जुलै रोजी फोंडा पोलिसांनी माश्रेल येथे धाड घालून संजय वर्मा या मध्य प्रदेशातील आरोपीला अटक केली असता त्याच्याकडे आठ लाखांचा गांजा सापडला होता. 24 जुलैला भोमा येथे पोलिसांनी दोन बिहारी युवकांना अटक केली असता त्यांच्याकडे 84 हजारांचा गांजा सापडला होता. साखळी येथे 18 ऑगस्ट रोजी अशाचप्रकारे रमेश चंद्रन या 28 वर्षीय  ओरिसाच्या युवकाला अटक केली असता त्याच्यावर तब्बल सहा किलो (सहा लाख) गांजा सापडला होता.

कोलवाळ तुरुंगातही गांजाया गांजाच्या तावडीतून कोलवाळचा तुरुंगही सुटलेला नाही. 13 मार्च रोजी या तुरुंगाची झडटी घेतली असता एका जेल गार्डकडेच 10 हजाराचा गांजा सापडला होता. एकाच महिन्याने म्हणजे 9 एप्रिलला कोलवाळ तुरुंगात पुन्हा एकदा असा प्रकार घडला. यावेळी जेम्स संडे या नायजेरियनकडे 10 हजाराचा गांजा सापडला होता. 17 जुलै रोजी या तुरुंगातील बिघडलेला ग्राईंडर दुरुस्त करुन तो परत तुरुंगात आणताना हा ग्राईंडर घेऊन आलेल्या रिक्षा चालकाकडे चार हजाराचा गांजा सापडला होता.

चक्क लागवडगोव्यात या नशिली ग्रासला असलेली वाढती मागणी पाहून गोव्यात गांजाचे पिक घेण्याचेही प्रकार उघडकीस आले असून 11 एप्रिल रोजी कळंगूट येथे अशी गांजाची शेती करत असताना एका रशियन जोडप्याला अटक करुन त्यांच्याकडून तीन लाखांचा गांजा पकडला होता. 4 ऑगस्टला कळंगूट येथेच गांजाचे पीक घेत असल्याच्या आरोपाखाली आंतोनियो फर्नाडिस या स्थानिकाला अटक करण्यात आली होती. पणजीच्या कांपाल भागात असलेल्या झोपडपट्टीतही गांजाचा व्यवहार करत असल्यामुळे 19 जुलैला जी कारवाई केली होती त्यावेळी या झोपडपट्टीतील पाईपमध्ये गांजाच्या लपवून ठेवलेल्या 43 पुडय़ा जप्त केल्या होत्या. ताळगाव भागातही गांजाची प्रकरणो उघडकीस आली आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसDrugsअमली पदार्थgoaगोवा