शेतकरी, कारागिरांना सक्षम बनविण्याचे ध्येय: आमदार दिव्या राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 13:13 IST2025-04-18T13:12:32+5:302025-04-18T13:13:02+5:30
लागवडीसाठी तरुणांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश, ग्रामीण विकासासाठी साधणार संवाद

शेतकरी, कारागिरांना सक्षम बनविण्याचे ध्येय: आमदार दिव्या राणे
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: काजू उत्पादन हे पिढ्यानपिढ्या गोव्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि संस्कृतीचा कणा राहिला आहे. ही गोष्ट बऱ्याच अंशी अकथित राहिली आहे. येथील शेतकरी, कारागीर आणि बचत गटांना त्यांच्या कलागुणांना प्रोहत्सान देण्याबरोबरच महोत्साहात जागा देत त्यांच्या उत्पादित मालाला प्रसिद्धीबरोबरच त्यांना सक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून 'काजू महोत्सव' सुरु करण्यात आला, असे गोवा वन विकास महामंडळा (जीएफडीसी) च्या अध्यक्षा आमदार डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले.
परंपरा व आधुनिकतेला जोडण्याची संधी दिसली. अशी जागा निर्माण करण्याची जिथे काजू केवळ एक फळ नसून गोव्याच्या कृषीप्रधान आत्म्याचा उत्सव असेल. या उत्सवाची संकल्पना त्या अज्ञात नायकांना श्रद्धांजली म्हणून करण्यात आली होती. या बागांचे संगोपन करणारे शेतकरी, कुशलतेने काजूचे साल काढणाऱ्या महिला आणि साध्या काजू फळाचे फेणीमध्ये रूपांतर करणारे डिस्टिलर ह्यांना असेल, असे आमदार राणे यांनी सांगितले.
गोव्याच्या काजू फळाला त्याची योग्य ओळख असायला हवी, असे विश्वास ठेवणारे सरकार, स्थानिक समुदाय आणि भागधारकांच्या पाठिंब्याने आकार घेतलेला हा एक सामूहिक दृष्टिकोन आहे, असे सांगून आमदार डॉ. राणे म्हणाल्या की, या महोत्सवाला काजू उत्पादकांचा प्रतिसाद सकारात्मक आणि उत्साहवर्धक आहे. पहिल्या हंगामापासूनच पारंपरिक पद्धतीच्या पलीकडे काजू उत्पादनाची विविधता प्रदर्शित करण्यासाठी काजू महोत्सवाची ओळख वाढत आहे. काजू आधारित उत्पादनांची विस्तृत श्रेणी सादर करण्याची तयारी उत्पादकांनी दाखवली आहे, जी बाजारपेठेच्या संधींबद्दल विकसित होत असलेली समज दर्शवते. एकूण सहभाग समाधानकारक असला तरी, व्यापक आणि अधिक समावेशक सहभाग करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आम्ही मान्यता देतो. आम्हाला अपेक्षा आहे की या महोत्सवामुळे तरुण शेतकऱ्यांमध्ये काजू लागवडीबद्दल रस निर्माण होईल आणि कालांतराने त्याचे संभाव्य मूल्य सुद्धा अधिक समजेल.
पहिल्या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या महोत्सवाला "राज्य महोत्सव" म्हणून हणून घोषित केले. हा एक ऐतिहासिक क्षण होता ज्यामुळे त्याला अधिकृत मान्यता आणि गती मिळाली. या घोषणेमुळे लक्षणीय वाढ झाली आहे. अधिक संस्थात्मक समर्थन, आंतर-विभागीय सहकार्य आणि इतर प्लॅटफॉर्मवर व्हिसिबिलीटी वाढलेली दिसते. गोव्याचा समृद्ध कृषी वारसा आणि सांस्कृतिक चैतन्य प्रदर्शित करण्यासाठी महोत्सव उपयुक्त ठरतो, असेही आमदार राणे म्हणाल्या.
काजू लागवडीलाही चालना
गोवा काजू महोत्सव गोव्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि कृषी-पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. काजू लागवडीपासून ते फेणीच्या आसवनापर्यंत या महोत्सवात काजू गॅलरी आणि थेट प्रात्यक्षिकांमुळे या महोत्सवाला महत्त्व प्राप्त होते. हे केवळ महिलांच्या नेतृत्वाखालील बचत गटांचेच नव्हे तर स्थानिक कारागिरांचेही जीवनमान उंचावते, तसेच उद्योजकता आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देते.
या महोत्सवाने गोव्यातील काजूची ओळख जपून काजू लागवडीला चालना दिली आहे. हे केवळ एका उत्सवापेक्षाही अधिक आहे, परंतु शाश्वत ग्रामीण विकास, सांस्कृतिक पर्यटन आणि गोव्याच्या समृद्ध स्थानिक वारसा आणि पर्यटकांमधील सखोल संबंधांसाठी उत्प्रेरक म्हणून काम कर. शाश्वत शेती व ग्रामीण विकासासाठी आमचे दृष्टिकोन समजून घेणाऱ्या युनियन लीडरशीशी संवाद साधण्यास आम्ही उत्सुक आहोत, असेही आमदार राणे यावेळी बोलताना म्हणाल्या.
महोत्सवासाठी पणजीच योग्य
पणजी राजधानीचे शहर असल्यामुळे रहिवासी आणि पर्यटक दोघांसाठीही एक केंद्र आणि मध्यवर्ती ठिकाण म्हणून काम करते. येथे काजू महोत्सवाचे आयोजन केल्याने जास्तीत जास्त प्रचार, सुलभता आणि सहभाग सुनिश्चित होतो. तथापि, उत्सव वाढत असताना, काजू उत्पादक प्रमुख तालुक्यांमध्ये किंवा ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन निश्चितच फायदेशीर ठरेल. यामुळे शेतकरी समुदायांशी असलेले संबंध अधिक दृढ होतीलच, शिवाय त्यांचे अनुभव अगदी जवळून समजून घेता येतील. सध्या तरी, राज्याच्या प्रतिष्ठित काजू संस्कृतीच्या या उत्सवासाठी पणजी हे एक आदर्श ठिकाण आहे, असेही आमदार राणे म्हणाल्या.