ZP Election 2025: अनेक मतदारसंघांमध्ये रंगतदार लढती; आजी-माजी मंत्री, आमदारांनी कंबर कसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:00 IST2025-12-19T12:00:24+5:302025-12-19T12:00:24+5:30

Goa ZP Election 2025: यंदाची ही निवडणूक पक्षीय पातळीवर होत असून भाजप-मगो युती, काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युती, आप, आरजी तसेच मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवत आहेत.

goa zp elections 2025 contests in many constituencies former and current ministers mla braced for battle | ZP Election 2025: अनेक मतदारसंघांमध्ये रंगतदार लढती; आजी-माजी मंत्री, आमदारांनी कंबर कसली

ZP Election 2025: अनेक मतदारसंघांमध्ये रंगतदार लढती; आजी-माजी मंत्री, आमदारांनी कंबर कसली

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीसाठी तब्बल ८ लाख ६९ हजार ३५६ मतदार २२६ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. अनेक मतदारसंघांमध्ये रंगतदार लढती होणार असून काहीजणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यंदाची ही निवडणूक पक्षीय पातळीवर होत असून भाजप-मगो युती, काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युती, आप, आरजी तसेच मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवत आहेत.

शिरोडा मतदारसंघात जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांची कन्या गौरी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असून येथे रंगतदार लढत होणा आहे. कुठ्ठाळी मतदारसंघात अपक्ष आमदार आंतोन वास यांची पत्नी मर्सियाना अपक्ष म्हणून तर कोलवाळ मतदारसंघात माजी आमदार किरण कांदोळकर यांची पत्नी कविता अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघांमधील लढतींकडे लोकांचे विशेष लक्ष आहे. ही निवडणूक केवळ स्थानिक प्रश्नांपुरती मर्यादित न राजकारण आणि पक्षीय रणनीती यांची राहता महिला मतदारांचा प्रभाव, बूथ कसोटी ठरणार आहे. 

याशिवाय लाटंबार्से मतदारसंघात आमदार डॉ. चंद्रकांत शेट्येंचे समर्थन लाभलेला भाजप उमेदवार पद्माकर मळीक तसेच काँग्रेसला रामराम ठोकून अपक्ष उमेदवारी भरलेले मेघः श्याम राऊत, हरमल मतदारसंघात माजी आमदार दयानंद सोपटे ज्यांच्यासाठी नेटाने वावरत आहेत त्या भाजप उमेदवार मनिषा कोरखणकर, हळदोणेत भाजप उमेदवार सुभाष मोरजकर, चिंबलमध्ये भाजप उमेदवार गौरी प्रमोद कामत, हणजूणमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेला व मोगॅम्बो या टोपण नावाने परिचित असलेला योगेश गोवेकर, पैंगीणमध्ये गोवा फॉरवर्डचे उमेदवार प्रशांत नाईक यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. 

दरम्यान, काही मतदारसंघांमध्ये थेट लढती आहेत. कवलें, पाळी या मतदारसंघांमध्ये दोन दोनच उमेदवार आहेत. उद्या शनिवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतपत्रिकांद्वारे मतदान होईल. आज शुक्रवारी निवडणूक कर्मचारी साहित्य घेऊन मतदान केंद्रांवर दाखल होतील.

महिलांचा कौल निर्णायक

अनेक मतदारसंघांत महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. हा कल राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा इशारा मानला जात आहे.

हळदोणेत ९,३८५, कळंगुटमध्ये ११,३३६, सांताक्रुझमध्ये १०,११३, सुकूरमध्ये १२,६०१ व खोर्लीत १२,१७७महिला मतदार आहेत.

दक्षिण गोव्यात कुडतरीत १०,४१४, कवळेंत १०,१९७, बाणावलीत १०,६९०, कुठ्ठाळीत ९,३६८ तर राय मतदारसंघात ९,०४३ महिला मतदार आहेत.

महिला स्वयंसाहाय्य गट, पाणी, आरोग्य, रस्ते, रोजगार आणि सामाजिक सुरक्षा हे मुद्दे आहेत. महिला मतदारांचा कल दुर्लक्षित करणाऱ्या उमेदवारांना याचा थेट फटका बसू शकतो.

उत्तर गोव्यात २,१३,७०४ पुरुष व २,२६,४९२ महिला व तृतीयपंथी ३ मिळून ४,४०१९९ मतदार आहेत. तर दक्षिण गोवा जिल्ह्यात २,०६,९०२ पुरुष व २,२२,२५३ महिला व तृतियपंथी मिळून ४,२९,१५७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उत्तर गोवा जिल्ह्यात ६५८ व दक्षिणेत ६२६ 3 मिळून एकूण १२८४ केंद्रांवर मतदान होईल. त्यासाठीची जय्यत तयारी केली असल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, 'सत्ताधारी आमदार, मंत्र्यांना या निवडणुकीत पर्फोर्मन्स दाखवावाच लागेल. जि. पं.च्या एखाद्या जागेवर उमेदवाराचा पराभव होणे म्हणजे तेथील आमदार, मंत्र्यांची लोकप्रियता कमी झाली असेच म्हणावे लागेल. काही काम न करता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष तिकीट देईल या भ्रमात कोणी राहू नये व याबाबतीत पक्षाला गृहित धरू नये.'

 

Web Title : ज़िला परिषद चुनाव: कई क्षेत्रों में ज़ोरदार मुकाबला; नेताओं की प्रतिष्ठा दांव पर

Web Summary : ज़िला परिषद चुनावों में 8.69 लाख मतदाता 226 उम्मीदवारों का भाग्य तय करेंगे। मुख्य मुकाबले मंत्रियों के रिश्तेदारों और पूर्व विधायकों की पत्नियों के बीच हैं। महिला मतदाताओं, स्थानीय मुद्दों और पार्टी रणनीतियों पर ध्यान केंद्रित है। प्रदर्शन आगामी विधानसभा टिकटों को प्रभावित करेगा।

Web Title : Zilla Parishad Elections: Fierce Battles Emerge; Leaders Stake Reputation

Web Summary : Zilla Parishad elections see 8.69 lakh voters deciding fates of 226 candidates. Key contests involve ministers' relatives and ex-MLAs' spouses. Focus on women voters, local issues, and party strategies. Performance will influence future assembly tickets.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.