शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत
2
IND vs SA : दोन वर्षांनी टीम इंडियाच्या बाजूनं लागला नाणेफेकीचा कौल! या खास Trick सह KL राहुल ठरला टॉसचा बॉस!
3
असं काय झालं की 'या' देशाने तालिबानी अधिकाऱ्यांना थेट आपल्या देशात 'नो एन्ट्री' म्हटलं?
4
Nagpur Crime : स्टोरी एकदम वेगळी ! लग्नाच्या वादातून प्रेयसीनेच संपवले 'त्याला', तिने केलेला बनाव उघड, मोबाइल फॉरमॅट करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न
5
डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत
6
बाजारात एन्ट्री घेताच ₹२०० च्या वर जाऊ शकतो 'हा' शेअर; GMP सुस्साट, ४३७ पट झालेला सबस्क्राईब
7
दुसरं लग्न करायला उभा राहिला नवरदेव; भर मांडवात कडेवर मूल घेऊन पोहोचली पहिली पत्नी अन्...
8
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
9
फडणवीस म्हणाले,१० फेऱ्या सुरू, रेल्वेला आयोगाची परवानगी हवी; उरण-नेरूळ-बेलापूर फेऱ्या वाढणार
10
माजी आमदार कदम यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप निश्चित, गुन्हेगारी प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात होणार
11
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
12
गुरवली रेल्वे स्टेशन होऊ शकत नाही; रेल्वेनेच केले स्पष्ट, वेळापत्रकावर  परिणाम
13
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
14
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
15
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
16
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
17
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
18
IndiGo: पाणी नाही, जेवण नाही, कॅप्टनही गायब; इंडिगोच्या प्रवाशानं काढलेला व्हिडीओ एकदा बघाच!
19
Accident: अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, जळगावची महिला ठार
20
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
Daily Top 2Weekly Top 5

आरजीला दिला 'धक्का'; काँग्रेस व गोवा फॉरवर्डचीच युती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 11:31 IST

आज अंतिम निर्णय; आरजी, आपकडून आणखी उमेदवार जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या आघाडीत आता आरजीला स्थान राहिलेले नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने आरजीला वाऱ्यावर सोडल्यातच जमा असून युतीच्या अनुषंगाने जागा वाटपासाठी आज, शनिवारी गोवा फॉरवर्डच्या नेत्यांसोबत बोलणी करण्यास बैठक बोलावली आहे. मात्र, जखमी झालेल्या आरजीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला आपला 'उजो' दाखवावा असा निर्धार केला आहे.

काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे काल शुक्रवारी येणार होते. परंतु इंडिगोची विमाने रद्द झाल्याने ते पोहचू शकले नाहीत. ते आज, शनिवारी गोव्यात येतील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना पत्रकारांनी आघाडीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, 'युती घडवून आणण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न आमचा राहील. युतीसंदर्भात ज्या मतदारसंघांमध्ये मित्र पक्षांसोबत आमची बोलणी चालू आहेत, ते मतदारसंघ बाजुला ठेवूनच २२ मतदारसंघांमध्ये आम्ही उमेदवार जाहीर केले आहेत. आमचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे काल इंडिगोची विमानसेवा रद्द झाल्याने पोहोचू शकले नाहीत. ते आज, शनिवारी गोव्यात येतील. युतीसंदर्भात बैठक घेऊन तेच काय तो अंतिम निर्णय जाहीर करतील.' 

दरम्यान, काँग्रेसने युतीबाबत स्पष्ट काहीही सांगण्यास वेळ लावला. त्यामुळे जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचारात आम्ही मागे पडलो अशी खंत आरजी पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांनी व्यक्त केली. काँग्रेससोबत झालेल्या बैठकीत १२ जिल्हा पंचायत जागांबाबत चर्चा झाली होती असेही त्यांनी सांगितले. आता 'काँग्रेससाठी आम्ही आणखीन थांबू शकत नाही.

जाहीरनामा लवकरच : मनोज परब

म्हापशात शिरसई, कोलवाळ, शिवोली व हणजूण मतदारसंघातील आरजीच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पक्षप्रमुख मनोज परब म्हणाले की, 'आरजी आपला जाहीरनामा लवकरच घोषित करणार आहे. आमचे सर्व उमेदवार सामान्य वर्गातील आहेत. गोव्यासाठी काही ना काही करण्याची त्यांची तळमळ आहे. गावांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर आवाज उठवले. ग्रामसभांमध्येही नेहमीच कोणते ना कोणते प्रश्न घेऊन बोलत असतात. ते गोव्याच्या हिताचे विषय घेऊन पुढे जातील. राज्यात भाजप सरकारकडे कोणतेही धोरण नाही. अंदाधुंद कारभार आहे.'

आरजीचे 'एकला चलो रे'

आरजीने 'एकला चलो रे' भूमिका घेत आणखी १४ उमेदवार जाहीर केले असून, शुक्रवारी काही उमेदवारांनी अर्जही भरले. त्यामुळे आरजी विरोधकांच्या आघाडीत नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, आरजीने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांची संख्या २६ झाली. सांताक्रूज, सेंट लॉरेन्स या मतदारसंघांमध्येही आरजीच्या उमेदवारांनी अर्ज भरले. काँग्रेसने आधी जाहीर केलेल्या काही जागांवर आरजीने - आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यात कळंगुट, सुकूर, रेइश मागुश, चिंबल या जागांचा समावेश आहे. २०२० च्या जिल्हा पंचायत निवडणुकीत उत्तर गोव्यात सांताक्रुझ या एकमेव मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार शायनी ऑलिवेरा विजयी ठरल्या होत्या. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही गुरुवारी आरजीने येथेही उमेदवार जाहीर केला.

ते मतदारसंघ काँग्रेसचेच

पाटकर म्हणाले की, 'ज्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे बळ आहे त्या मतदारसंघांवर साहजिकच काँग्रेसचाच हक्क आहे. सांताक्कुझसारख्या मतदारसंघात गेल्या जि. पं. निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. तेथे आम्ही आमचा उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसने उमेदवार जाहीर केले असले तरी एकानेही अजून अर्ज भरलेला नाही. युतीबाबत अंतिम बोलणी आज होईल.'

पाचव्या दिवशी ३९ उमेदवारी अर्ज

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काल पाचव्या दिवशी ३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. बहुतांश अर्ज आरजी व भाजप उमेदवारांचेच आहेत. भाजपतर्फे हरमलमध्ये मनीषा कोरखणकर, सुकूरमध्ये अमित अस्नोडकर, पेन्ह द फ्रान्समध्ये संदीप साळगांवकर, बेतकी खांडोळामध्ये श्रमेश भोसलें, रिवणमध्ये राजश्री गावंकर आदींनी अर्ज भरले. अनेक ठिकाणी डमी अर्जही भरले आहेत. आरजीतर्फे शिवोलीत जयेंद्र पाडोळकर, कोलवाळमध्ये प्रज्ञा सावंत, हणजुणमध्ये मिंगेल क्वेरोज, कळंगुटमध्ये अनन्या कांदोळकर आदींनी अर्ज भरले. काही मतदारसंघांत अपक्षांनी अर्ज भरले आहेत.

आपकडून पाच उमेदवार जाहीर

आम आदमी पक्षाने आपले आणखी पाच उमेदवार जाहीर केले. आपने यापूर्वी २९ उमेदवार जाहीर केले होते. पक्षाने पहिल्या यादीत १४, दुसऱ्या यादीत ८, तर तिसऱ्या यादीत ७ उमेदवार जाहीर केले. आता आणखी पाचजणांची नावे घोषित करून पक्षाने ३४ मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : RGP Left Out: Congress and Goa Forward Alliance for Election

Web Summary : Congress sidelined RGP for local elections, partnering with Goa Forward. RGP will contest independently after talks failed. AAP announced more candidates. Congress aims for alliance despite seat disagreements, finalizing decisions soon.
टॅग्स :goaगोवाZP Electionजिल्हा परिषदzpजिल्हा परिषदLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकPoliticsराजकारण