गोवा : सुकूरमध्ये दुचाक्यांच्या धडकेत युवक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 16:05 IST2024-01-15T16:05:31+5:302024-01-15T16:05:45+5:30
जखमी रितेश कांबळी याला इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गोवा : सुकूरमध्ये दुचाक्यांच्या धडकेत युवक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
पर्वरी : सुकूरमध्ये सोमवारी (दि. १५) दोन दुचाक्यांच्या धडकेत एक युवक ठार झाला. या अपघातत दुसरा दुचाकीस्वार जखमी झाला आहे. राहुल खडपे (३१ ,सुकूर) असे मृत तरुणाचे नाव असून रितेश कांबळी (४६) हा जखमी झाला. अपघाताची नोंद पर्वरी पोलीस स्थानकात झाली आहे.
पोलिस निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सोमवारी पहाटे अपघात झाल्याचे सांगण्यात आला. राहुल हा आपल्या केटीएम मोटारसायकल (जीए-०३ एएन-७०२९)ने जात असता समोरून येणाऱ्या रितेश कांबळी याच्या (जीए-०७, व्ही-५८३४)
या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात राहुल ठार झाला.
त्याचा मृतदेह गोमेकॉमध्ये पाठविण्यात आला. तर जखमी रितेश कांबळी याला इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सहाय्यक उपनिरीक्षक रेडकर यांनी अपघाताची नोंद झाली असल्याचे सांगितले. उपनिरीक्षक सर्वेश भांडारी पुढील तपास करीत आहेत.