Goa: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या विधानाचा गोवा कॉग्रेस पक्षाकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 13:26 IST2023-10-11T13:25:41+5:302023-10-11T13:26:04+5:30
Ramdas Athawale: केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गाेव्यात पत्रकार परिषद घेऊन गाेव्यातील अनुसुचित समातींना राजकीय आरक्षण मिळणे अशक्य असल्याचे विधान केले होते. याचा गोवा कॉँग्रेस पक्षातर्फे निषेध केला.

Goa: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या विधानाचा गोवा कॉग्रेस पक्षाकडून निषेध
- नारायण गावस
पणजी - केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गाेव्यात पत्रकार परिषद घेऊन गाेव्यातील अनुसुचित समातींना राजकीय आरक्षण मिळणे अशक्य असल्याचे विधान केले होते. याचा गोवा कॉँग्रेस पक्षातर्फे निषेध केला. ही केंद्रीय भाजप व गाेवा भाजप सरकारने एसटी समाजाची केलेली फसवणूक आहे. असा अराेप कॉग्रेसचे प्रवक्ते सुनिल कवठणकर यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांच्या सोबत कॉँग्रेसचे सचिव जोसेफ वाझ,परुशुराम जल्मी व अन्य नेते उपस्थित होते.
प्रत्येक वेळी भाजपने एसटीला आरक्षण दिले जाणार असे आश्वासन दिले होते. पण यासाठी कधीच पुढाकार घेतला नाही. आता मंत्री रामदास आठवले यांनी या विषयी स्पष्टीकरण देऊन भाजपचा खरा चेहरा एसटी समाजाच्या लोकांना दाखवून दिला आहे. प्रत्येक निवडणूकीत भाजपने एसटीला राजकीय आरक्षण दिले जाणार असे सांगुन मते मिळविली आहे. पण यासाठी काहीच केले नाही केंद्रात तसेच गाेव्यात भाजपचे सरकार आहे. पण या भाजपने फक्त एसटी समाजाची फसवणूक केली आहे., असे सुनिल कवठणकर यांनी सांगितले.
गोव्यात मोठ्या प्रमाणात एसटी समाजाचे लोक राहत आहे. पण भाजपने लाेकांचा फक्त निवडणूकीसाठी वापर केला आहे. हा समाज राज्यघटनेेने दिलेला हक्क मागत आहे. पण हे सरकार त्यांना त्यांचा हक्क देत नाही. केद्रीय मंत्र्यांनी या विषयी स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही कॉंग्रेस पक्ष या विधानाचा निषेद करतो. कॉग्रेस पक्ष एसटी समाजाबराेबर आहे, असे यावेळी कॉँग्रेसचे सचिव जोसेफ सिक्वेरा यांनी सांगितले.