शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

‘थॉमस कूक’ बंद पडल्याने गोव्याच्या पर्यटनावर आघात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 6:01 PM

व्यावसायिक धास्तावले : ब्रिटिश पर्यटक बंद झाल्यास मोठा आर्थिक फटका

पणजी : ‘थॉमस कूक’ ही सर्वात जुनी टुरिस्ट ट्रॅव्हल कंपनी बंद पडल्याने त्याचा मोठा फटका गोव्याच्या पर्यटन व्यवसायाला बसणार आहे. गेली २५ ते ३0 वर्षे ही ट्रॅव्हल कंपनी ब्रिटिश पर्यटकांना गोव्यात आणत होती. गोव्याला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांमध्ये ब्रिटिश पाहुण्यांचा दुसरा क्रमांक लागतो. सर्वाधिक पर्यटक रशियातून येत असतात. ‘थॉमस कूक’ बंद पडल्याने हा गोव्याच्या पर्यटनाला मोठा आघात आहे. 

टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी) चे अध्यक्ष सावियो मेशियस म्हणाले की, ‘थॉमस कूक’ दर आठवड्याला सात चार्टर विमानांमधून कमीच ते २१00 ब्रिटीश पर्यटक गोव्यात आणत होती. पर्यटन व्यावसायिकांना हा सर्वात मोठा फटका आहे. केवळ हॉटेलमालकच नव्हे तर शॅकवाले, टॅक्सीवाले अशा सर्वच घटकांना याचा जबर आर्थिक फटका बसणार आहे.’ 

मेशियस पुढे म्हणाले की, ‘ ब्रिटिश पर्यटकांचे गोव्यात सरासरी १४ रात्री गोव्यात वास्तव्य असते. ब्रिटिश पर्यटक भारतात आले की, एकाच ठिकाणी किंवा एकाच हॉटेलात राहतात. खरा आनंद लुटण्यासाठी येणारे हे पर्यटक रिलॅक्स मूडमध्ये आपली सुट्टी येथे मजेत घालवत असतात आणि मोठ्या प्रमाणात ते खर्चही करीत असतात त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना याचा बराच लाभ होत असतो. हे उत्पन्न बुडणार आहे.’

२0१८ साली १ लाख ४८ हजार ब्रिटिश पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. गोव्यातील पर्यटन व्यावसायिकांमध्ये ब्रिटीश पर्यटक प्रिय आहेत. ब्रिटिश पर्यटक १४ ते २१ दिवस गोव्यात राहतात. काहीवेळा त्यांचे वास्तव्य ७ दिवस असते परंतु अन्य देशांच्या पर्यटकांप्रमाणे ते घाईघाईने किंवा लवकर गोव्याची सहल आटोपत नाही. ब्रिटनमध्ये हिंवाळा असतो तेव्हा ब्रिटिश पर्यटक येथे भेट देत असतात.

मेशियस म्हणाले की,‘ या पर्यटकांसाठी अनेक हॉटेलांच्या खोल्यांचे आरक्षण थॉमस कूक करीत होती. ३0 वर्षात या कंपनीने आपली पत सांभाळून ठेवली होती. विमान भाडे, हॉटेल, गोवा फिरण्यासाठी वाहन व्यवस्था असे सर्व पॅकेज ही कंपनी देत असे. गेल्या दोन वर्षात जागतिक मंदीमुळे आधीच विदेशी पर्यटकांची संख्या रोडावली आहे. त्यात भर म्हणून ‘थॉमस कूक’ ही १७८ वर्षे जुनी ट्रॅव्हल कंपनी कोलमडल्याने गोव्याच्या पर्यटन व्यवसायासाठी तो फार मोठा आघात आहे. 

                                     शॅक मालकांनाही चिंता अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांनीही चिंता व्यक्त करताना गोव्याच्या पर्यटनावर हा फार मोठा आघात असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, ‘गोव्याला नेहमी भेट देणाºया आपल्या ओळखीच्या किमान पाच ब्रिटीश पर्यटकांनी बुकींग रद्द केले असल्याचे संदेश पाठवले. येत्या हंगामात १0 हजार ब्रिटीश पर्यटक जरी घटले तरी तो पर्यटन व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका ठरणार आहे. शॅक उभारण्याबाबत आधीच अनेक अडथळे आहेत. सीझेडएमपी तयार झाल्याशिवाय शॅक धोरण राबवू नका, असा आदेश हरित लवादाने दिलेला आहे. या गर्तेत असताना हे नवीन संकट कोसळले.’दरम्यान, शॅकमालक संघटनेने हरित लवादाच्या आदेशास आव्हान देणारी जी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केली आहे त्यावर आज मंगळवारी सुनावणी होणार आहे. 

टॅग्स :goaगोवा