शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

Goa: गोव्याला केंद्राकडून विशेष वागणूक, पुरेसा निधीही, खास दर्जाचा प्रश्नच उद्भवत नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

By किशोर कुबल | Published: April 30, 2024 3:03 PM

Goa Lok Sabha Election 2024: गोव्याला केंद्र सरकारकडून वेळोवेळी विशेष वागणूक मिळत आहे. तसेच पुरेसा निधीही दिला जात आहे. त्यामुळे आणखी खास दर्जाचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

- किशोर कुबल पणजी - गोव्याला केंद्र सरकारकडून वेळोवेळी विशेष वागणूक मिळत आहे. तसेच पुरेसा निधीही दिला जात आहे. त्यामुळे आणखी खास दर्जाचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

एका प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, मोदीजींनी नुकत्याच झालेल्या जाहीर सभेतही गोव्याविषयी विशेष उद्गार काढलेले आहेत. गोव्याला काहीही कमी पडू देणार ना,ही असे पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केलेले आहे. गोव्याचे अनेक प्रश्न केंद्र सरकारने मार्गी लावले आहेत. आतापर्यंत ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक निधी गोव्याला दिला. मोपा येथे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आला. आयुष इस्पितळ दिले. झुवारी नदीवर नवीन पूल आला. अटल सेतू, राष्ट्रीय महामार्गांचे विस्तारीकरण आदी अनेक प्रकल्प आले. मोदीजींनी गोव्यातील मच्छिमार बांधवांनाही आश्वस्त केले आहे. सीआरझेडच्या कचाट्यातून मच्छीमारांना सोडवण्यात येईल. कुणाच्याही घरावर टाच येणार नाही, अशी हमी देण्यात आलेली आहे.

गोव्याला खास दर्जा देण्याच्या बाबतीत भाजपने कोणतेही आश्वासन न  दिल्याने किंवा मोदीजींकडून याबाबतीत कोणतीही घोषणा न झाल्याने विरोधकांकडून टीका केली जात होती. केंद्र सरकारकडे खास दर्जाच्या मागणीचा पाठपुरावा राज्य सरकारने थांबवल्याने टीका केली जात होती. मुख्यमंत्र्यांना यासंबंधी विचारले असता त्यांनी आता खास दर्जाचा प्रश्नच नसल्याचे सांगून या विषयावर पडदा पाडला आहे.

टॅग्स :goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४Pramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४