गोवा : नदीत उडी मारलेल्या महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 16:51 IST2023-11-19T16:49:34+5:302023-11-19T16:51:23+5:30

तीन दिवसांच्या शोध मोहीमेनंतर तिचा मृतदेह सापडल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी राहुल देसाई यांनी दिली. 

Goa The body of a female health worker who jumped into the river was found | गोवा : नदीत उडी मारलेल्या महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला

गोवा : नदीत उडी मारलेल्या महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला

डिचोली : आरोग्य खात्याची कर्मचारी असलेली अनुपमा गावकर (२४, वेळगे-सत्तरी) या तरुणीचा मृतदेह आमोणा नदीत सारमानस येथे सापडला. शुक्रवारी अनुपमान हिने आमोणा पुलावरून उडी मारली होती. तीन दिवसांच्या शोध मोहीमेनंतर तिचा मृतदेह सापडल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी राहुल देसाई यांनी दिली. 

वेळगे-सत्तरी येथील अनुपमा गावकर ही आरोग्य खात्यात काम करते. तिची दुचाकी आमोणा पुलावर पार्क केलेली होती. त्यामुळे तिथे दुचाकी पार्क करून नदीत उडी घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. स्थानिकांनी याची माहिती दिल्यानंतर डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू ठेवली होती. शनिवारी दिवसभर शोध घेण्यात आला. मात्र, मृतदेह सापडला नव्हता. रविवारी सारमानस परिसरात हा मृतदेह सापडला. 

Web Title: Goa The body of a female health worker who jumped into the river was found

टॅग्स :goaगोवा