गोव्यात कोविड-१९ मुळे बळी जाण्याची मालिका सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 13:42 IST2020-07-26T13:42:00+5:302020-07-26T13:42:55+5:30

राज्यात कोविडमुळे बळी जाण्याची मालिका सुरुच आहे. रविवारी एकाचा मृत्यू झाला. यामुळे एकूण संख्या 36 झाली. 

In Goa, the series of casualties due to Covid-19 continues | गोव्यात कोविड-१९ मुळे बळी जाण्याची मालिका सुरूच

गोव्यात कोविड-१९ मुळे बळी जाण्याची मालिका सुरूच

पणजी - राज्यात कोविडमुळे बळी जाण्याची मालिका सुरुच आहे. रविवारी एकाचा मृत्यू झाला. यामुळे एकूण संख्या 36 झाली. मुरगाव तालुक्यात कोविडचे बहुतांश रुग्ण आहेत व बहुतेक बळीही त्याच तालुक्यात आहेत. 63 वर्षीय व्यक्तीचा रविवारी मडगाव येथील कोविड इस्पितळात मृत्यू झाला. ते नवेवाडे वास्को येथील होते. त्याना डायबेटिस व उच्च रक्तदाबाचाही आजार होता. 

मुरगाव तालुक्यात एकूण सुमारे सातशे कोविडग्रस्त आहेत. जे 36 बळी आतापर्यंत गेले, त्यापैकी 80 टक्क्यांहून जास्त या तालुक्यातील आहेत. शनिवारी सहाजणांचा बळी गेला. त्यापैकी तिघे मुरगाव तालुक्यातील आहे.  राज्यात आतापर्यंत कोविडग्रस्तांची एकूण संख्या 4690 हून जास्त झाली आहे. 3 हजार 50 हून जास्त व्यक्ती आजारावर मात करण्यात यशस्वी झाल्या. 1 हजार 650 हून जास्त सक्रिय कोविडग्रस्त गोव्यात आहेत.

Web Title: In Goa, the series of casualties due to Covid-19 continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.