शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : पावसाचा धुमाकूळ सुरुच, घरांत शिरले पुराचे पाणी, शेतीबागायतींचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 15:02 IST

राज्यात गेला आठवडाभर धुवाधार पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. मुसळधार पडत असलेल्या पावसाने  करोडो रुपयांचे नुकसान झाले असून जीवितहानीही झाली आहे.

नारायण गावस :

पणजी: राज्यात गेला आठवडाभर धुवाधार पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. मुसळधार पडत असलेल्या पावसाने  करोडो रुपयांचे नुकसान झाले असून जीवितहानीही झाली आहे. लाेकांच्या  घरांच्या भिंती  कोसळल्या तसेच शेतीबागायतींचे नुकसात झाले. राज्यातील बहुतांश सर्व तालुक्यांना या  मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. 

पावसाचा धुमाकुळ सुरुच असून दीड महिन्यांत पाऊस शंभर पर्यंत पाेहचत आला आहे. आतापर्यंत एकूण ४१ टक्के पाऊस झाला. गेल्या २४ तासांत राज्यात ६.४ इंच पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने आजही रेड अलर्ट जारी केला असल्याने नर्सरी ते १२ वी पर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. 

राज्यातील धरणे ओव्हरफ्लो

मुसळधार पडत असलेल्या पावसाने राज्यातील बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. तिळारी धरण ओव्हरफ्लो झाल्याने आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. तसेच अंजूणे धरण  ८९.४ मीटरपर्यंत भरले असल्याने  ९० मीटरची पातळी भरल्यावर  या धरणातूनही आज  पाणी  सोडण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे साळावली, चापोली आमठाणे  ही धरणेही १०० टक्के भरली आहेत.

पडझडीमुळे मोठे नुकसान 

राज्यात मुसळधार पावसामुळे माेठी पडझड झाली आहे. या वित्त हानीप्रमाणे जीवितहानीही झाली आहे.  काही लोकांच्या घरच्या भिंती पावसाने कोसळल्या. त्यामुळे लाखो रुपयाची हानी  झाली आहे. त्याचप्रमाणे अनेक लोकांच्या घरावर झाडे पडून मोठे नुकसान  झाले आहे. तसेच  रस्त्यावरील गाड्यावर झाडे पडून मोठे नुकसान झाले. काही लाेकांच्या  घरावर वीज खांब पाडल्याने वीज खंडित होण्याच्या मोठ्या घटना घडल्या. 

शेतीबागायतींची मोठी हानी

राज्यात पडत असलेल्या  मुसळधार पवसाचा जास्त फटका हा शेती बागायीतना बसला आहे. अनेक लोकांच्या शेती बागायती पुराच्या पाण्याखाली गेल्याने शेतीची मोठ्या प्रमाणात  नाशाडी झाली आहे. सत्तरी, बार्देश, पेडणे, काणकोण बहतांश सर्व  तालुक्यांना याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी  कृषी खात्याने याकडे लक्ष घालून नुकसान भरपाई देण्याची मागी केली आहे.

टॅग्स :goaगोवा