Goa: संतापजनक! बापाकडून स्वत:च्या दिव्यांंग लेकीवर बलात्कार: संशयित गजाआड

By सूरज.नाईकपवार | Updated: July 6, 2023 11:55 IST2023-07-06T11:55:30+5:302023-07-06T11:55:50+5:30

Crime News: वित्र नात्याला काळीमा फासणारी एक घटना गोव्यातील घडली आहे. आपल्या स्वतच्या लेकीवर वडिलानेच बलात्कार केल्याची ही खळबळजनक घटना असून  पोलिसांनी त्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहे.

Goa: Outrageous! Rape of his disabled daughter by father: Suspect Gajaad | Goa: संतापजनक! बापाकडून स्वत:च्या दिव्यांंग लेकीवर बलात्कार: संशयित गजाआड

Goa: संतापजनक! बापाकडून स्वत:च्या दिव्यांंग लेकीवर बलात्कार: संशयित गजाआड

- सूरज नाईक पवार
मडगाव - पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक घटना गोव्यातील घडली आहे. आपल्या स्वतच्या लेकीवर वडिलानेच बलात्कार केल्याची ही खळबळजनक घटना असून  पोलिसांनी त्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहे. पिडीत युवती ही दिव्यांग असून, ती एकवीस वर्षाची आहे. संशयिताला पोलिसांनी अटक केली असून, भादंसंच्या ३७६,३५४,३२४ व कलम ९२ राईटस ऑफ पर्सन विथ डिसेबिलीटी ॲक्ट २०१६ अंतर्गंत पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे.

राज्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील मायणा कुडतरी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराची ही घटना घडली आहे.संशयित ४७ वर्षाचा असून, तो बस चालक आहे. पिडिताची आई परदेशात काम करीत आहे. १ जुलैच्या पूर्वी संशयिताने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले होते. चार वेळा त्याने तिच्यावर बलात्कार केला होता. तो तिला मारबडवही करीत होता.

Web Title: Goa: Outrageous! Rape of his disabled daughter by father: Suspect Gajaad