Goa: बाजारामध्ये निरफणस १५० ते २०० रुपये : ग्राहकांकडून निरफणसाला चांगली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 15:30 IST2024-05-06T15:30:31+5:302024-05-06T15:30:50+5:30
Goa News: राज्यात आंब्यानंतर आता बाजारात निरफणसाला मागणी वाढू लागली आहे. निरफणस ही अनेक लाेकांची आवडीची भाजी असल्याने माेठ्या प्रमाणात या निरफणसाला मागणी आहे. आता बाजारामध्ये निरफणस विक्रीस यायला लागले आहेत.

Goa: बाजारामध्ये निरफणस १५० ते २०० रुपये : ग्राहकांकडून निरफणसाला चांगली मागणी
- नारायण गावस
पणजी - राज्यात आंब्यानंतर आता बाजारात निरफणसाला मागणी वाढू लागली आहे. निरफणस ही अनेक लाेकांची आवडीची भाजी असल्याने माेठ्या प्रमाणात या निरफणसाला मागणी आहे. आता बाजारामध्ये निरफणस विक्रीस यायला लागले आहेत. सध्या राज्यातील विविध बाजारातील मार्केटमध्ये लहान आकाराचे निरफणस १२० ते १५० रुपयांनी विकले जात आहेत तर माेठ्या आगाराचे निरफणस २०० रुपये पर्यंत विकले जात आहे.
निरफणसाला मोठी मागणी असल्याने असल्याने त्याचा दरही चढाच असतो. अनेकांना निरफणसाची भाजी त्यापेक्षा जास्त निरफणसाची तळलेली कापे खूपच स्वादिष्ट लागतात. म्हणून अनेक लोक निरफणस घेतात. शहरापासून गावापर्यंत सर्वच भागात निरफणसाची झाडे आहेत. अनेक लाेक आता निरफणसाची कलमी झाडे लावतात. त्यामुळे निरफणसाचे सर्वच भागातून उत्पादन घेतल जाते. पण त्याचे उत्पादन हे कमी असते तसेच वर्षातून ठराविक वेळी मिळत असल्याने त्याला मागणी मोठी आहे.
आता पूर्वी सारखे मोठ्या आकाराचे निरफणस मिळत नाही. त्याला मोठे झाल्यावर कीड लागते. तर अनेक लहान आकाराचे निरफणस झाडावरुनच गळून पडतात. त्यामुळे त्याचे उत्पादन घटत आहे त्यामुळे याला मागणी जास्त असतें. पूर्वी आमच्या झाडाला मोठ्या प्रमाणात निरफणस मिळत होते. यंदा त्याची लागवड घटली आहे. पण निरफणसाला मागणी माेठी असते, त्यामुळे त्याला दरही चांगला मिळतो, असे साखळी मार्केटमधील गावठी भाजी निरफणस विक्रेत्या शेवंती नाईक यांनी सांगितले.