शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्र विशेष: वारूळ स्वरूपातील म्हार्दोळ कुंकळ्ये येथील श्री शांतादुर्गा देवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 12:18 IST

म्हार्दोळ कुंकळ्ये येथील शांतादुर्गा देवीचे मंदिर हे बाराव्या शतका पूर्वीपासून असल्याचे पुरातत्त्व पुरावे आहेत.

यामिनी मडकईकर, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : म्हार्दोळ कुंकळ्ये हा गाव शहरी दूषित वातावरणापासून दूर व निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. आजूबाजूला असलेली पोफळीची बागायती, झरे, ओहोळ अशा निसर्ग सौंदर्याची विशेष देणगी लाभलेल्या म्हार्दोळ कुंकळ्ये या गावात श्री शांतादुर्गा देवीचे सुंदर असे मंदिर पाहायला मिळते. म्हार्दोळ कुंकळ्ये येथील शांतादुर्गा देवीचे मंदिर हे बाराव्या शतका पूर्वीपासून असल्याचे पुरातत्त्व पुरावे आहेत.

देवीची पूजा अभिषेक करण्यासाठी मूर्ती असली तरी श्री शांतादुर्गा मंदिरात गाभाऱ्यामध्ये भव्य अशा वारुळाच्या स्वरूपामध्ये असलेली श्री शांतादुर्गा देवी हीच आपली माता आहे असे भक्तगण मानतात. देवीचे भक्तगण हे गोव्यातील तसेच महाराष्ट्र आदी भागांमध्ये विखुरलेले आहेत. आजकाल देवस्थानच्या मूळ बांधकामाच्या जागी  काँक्रिटचे नवे स्ट्रक्चर उभे केले जाते. मात्र म्हार्दोळ कुंकळ्ये येथील श्री शांतादुर्गा देवीचे मंदिर व स्ट्रक्चर आजही पूर्वीप्रमाणेच आहे. देवस्थानच्या बांधकामाला विशेष असे महत्त्व असून हेमाडपंती पद्धतीचे आकर्षक असे हे बांधकाम आहे. देवस्थानचे छप्पर शिखराचे आहे. देवस्थानाने आजही हे वेगळ्या पद्धतीचे बांधकाम टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे. गोव्यात अशा प्रकारचे वेगळे स्ट्रक्चर असलेली देवस्थाने आज खूप कमी प्रमाणात आढळून येतात.

देवीचा नवरात्री उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नऊ दिवस सुंदर अशा मखरात देवी विराजमान होते. नऊ दिवस नवरात्रीला देवी केवळ वाघ व सिंह या दोनच आसनांवर विराजमान होताना पाहायला मिळते. उत्सव हा योग्य पद्धतीने करता यावा यासाठी पूर्वीपासून नवरात्री उत्सवाला नऊ दिवस विविध कुटुंबांना सेवा करण्यासाठी मान दिलेला आहे. देवीचा नवरात्र उत्सव हा सर्व भक्तगण एकत्र येऊन साजरा करतात. श्री शांतादुर्गा देवीच्या देवस्थानात जत्रा उत्सव, पालखी, राम नवमी, नवरात्री असे विविध कार्यक्रम साजरे केले जातात. देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून व्यंकटेश शेणवी कुंकळ्येकर हे काम पाहतात.

टॅग्स :goaगोवाNavratri Mahotsav 2023शारदीय नवरात्रोत्सव 2023Navratriनवरात्री