शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

79 हजार कोटींचा महसूल बुडवला: क्लॉड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 10:49 PM

लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जर भाडेतत्वांचा लिलाव झाला असता तर 79 हजार कोटींचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला असता.

पणजी : लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जर भाडेतत्वांचा लिलाव झाला असता तर 79 हजार कोटींचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला असता. त्याऐवजी सरकारने अगदी फुकटात 88 भाडेतत्वांचे खाण कंपन्यांना नूतनीकरण करून दिले, असे गोवा फाऊंडेशनचे प्रमुख क्लॉड अल्वारीस यांनी सांगितले. आचार्य व पवनकुमार सेन आजपासून सेवेत राहूच शकत नाहीत, आम्ही लोकायुक्तांच्या आदेशाचे पालन व्हावे म्हणून विषयाचा पाठपुरावा करू, असे अल्वारीस यांनी स्पष्ट केले.लोकायुक्तांनी भाडेतत्व नूतनीकरणप्रश्नी दिलेल्या आदेशानंतर अल्वारीस यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. पार्सेकर, आचार्य व सेन यांच्याविरोधात एसीबीने एफआयआर नोंद करून खटला सुरू करावा असे लोकायुक्तांनी म्हटले आहे. मुख्य सचिवांनी या आदेशाची अंमलबजावणी करायला हवी. एसीबीच्या कारभाराबाबतही लोकायुक्तांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. अल्वारीस म्हणाले, की सरकारी तिजोरीला पार्सेकर व इतरांनी 79 हजार कोटींचे नुकसान केले. थोडी स्टॅम्प डय़ुटी काही कंपन्यांकडून घेतली गेली. सरकारला हा विषय सीबीआय चौकशीसाठी सोपवावा लागेल. र्पीकरांनीही लिजांचे नूतनीकरण केले होते पण त्यांचे निधन झाल्याने आम्ही त्या विषयाचा पाठपुरावा केला नाही. पार्सेकर जर आज मुख्यमंत्रीपदी असते तर लोकायुक्तांच्या आजच्या आदेशानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला असता.फाईलदेखील गायबअल्वारीस म्हणाले, की भाडेतत्व नूतनीकरणाच्या फाईल्स चौकशीवेळी लोकायुक्तांच्या ताब्यात पोहचल्या होत्या. अनेक फाईल्समधील महत्त्वाची कागदपत्रे गायब आहेत. तसेच एक फाईलच गायब आहे. एका फाईलमधील चारशे पाने गायब आहेत. भाडेतत्व नूतनीकरण हा मोठा भ्रष्टाचार असल्याचे व ते गुन्हेगारी स्वरुपाचे कटकारस्थान असल्याचेही लोकायुक्तांच्या आदेशातून स्पष्ट झाले.फेरविचार याचिका ही चेष्टा दरम्यान, सरकारने सर्वोच्च न्यायालयात खाणप्रश्नी जी फेरविचार याचिका सादर केली आहे, ती याचिका म्हणजे चेष्टा आहे. प्रत्यक्षात न्यायालयात याचिका पोहचलेलीच नाही. केवळ मिडियासाठी व लोकांच्या रंजनासाठी सरकारने सांगून टाकले की, फेरविचार याचिका सादर झाली आहे. दोन कंपन्या न्यायालयात गेल्या, मुख्यमंत्री सावंत हे त्या दोन कंपन्यांच्या याचिकेची माहिती स्वत:च्या ट्विटरवरुन देतात हे योग्य नव्हे.