शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

Goa: एनडीएतील घटक मगोप आणि तिन्ही अपक्ष आमदार भाजप उमेदवारांसाठी एकत्र, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

By किशोर कुबल | Published: April 30, 2024 2:45 PM

Goa Lok Sabha Election 2024: भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतील घटक पक्ष मगोप आणि तिन्ही अपक्ष आमदार एकत्र येत भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा जातीयवादी असल्याची टीका केली.

- किशोर कुबल पणजी  - भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतील घटक पक्ष मगोप आणि तिन्ही अपक्ष आमदार एकत्र येत भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा जातीयवादी असल्याची टीका केली. ते म्हणाले की, ' आज भाजपच धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. गोव्यातील बांधवांसाठी ओसीआय प्रश्न आम्ही सोडवला. माझ्या सरकारने त्यासाठी केंद्रात सातत्याने पाठपुरावा केला. विदेशात असलेल्या गोमंतकीयांची मालमत्ता सुरक्षित ठेवण्याची आमची जबाबदारी आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून त्यांच्या अपयशाचे दर्शन घडते.'

महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण देण्याची तरतूद असलेले विधेयक ॲड. रमाकांत खलप यांनी संसदेत आणले होते तर त्यांनी या विधेयकाचा पाठपुरावा का केला नाही? हे विधेयक त्यावेळी संमत का करून घेतले नाही? असा प्रश्नही सावंत यांनी केला.

मुख्यमंत्री म्हणाले की आपकी बार ४०० पार नक्की आहे. मोदींनी महिलांना ३३ टक्के आरक्षण राजकीय आरक्षण दिले. गोव्यात एसटी बांधवांना राजकीय आरक्षण देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे. सीआरझेडच्या बाबतीत मच्छीमारांची घरे वाचवली जातील. गोव्यात ज्या ज्या लोकांनी स्वतःच्या मालकीच्या जमिनीत घरे बांधलेली आहेत त्यांची घरे सरकार पाडणार नाही याची हमी मी देतो.

 ' या निवडणुकीसाठी राष्ट्राचा विचार करा, असे मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले की, भाजपच्या केंद्रीय जाहीरनाम्यात सत्तर वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या जेष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार जाहीर केले आहेत. ही एक मोठी घोषणा आहे. उलट काँग्रेसचा जाहीरनामा संभ्रम निर्माण करणारा आहे.  कोणाची संपत्ती काढून कोणाला वाटणार, हे काही स्पष्ट नाही. म्हादईच्या बाबतीत काँग्रेस राजकारण करत आहेत आमच्यासाठी ती जीवनदायी आहे.' वन नेशन वन इलेक्शन, महिलांचे राजकीय आरक्षण, नागरिकत्व कायदा आदी विषय मार्गी लावण्यासाठी केंद्रात मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच सत्तेवर येणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४Pramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४