शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

Goa: वास्को स्टेशनजवळ मालगाडीचा डबा घसरला, वास्को-पटणा एक्स्प्रेस दोन तास उशिराने

By पंकज शेट्ये | Updated: July 24, 2024 20:54 IST

Goa News: बुधवारी (दि.२४) संध्याकाळी साकवाळहून वास्को रेल्वे स्थानकावर येणाऱ्या मालवाहू रेल्वेच्या एका वॅगन (डबा) चे चाक घसरून रुळावरून बाहेर आले. मालगाडीचा एक डब्बा घसरून रुळाबाहेर आल्याने त्या रेल्वे मार्गावर अडथळा निर्माण झाल्याने वास्को रेल्वे स्थानकावरून पटना जाणारी वास्को - पटना एक्सप्रेस (१२७४१) प्रवासी रेल्वे सुमारे दोन तास उशिरा निघणार असल्याची माहीती मिळाली.

- पंकज शेट्ये वास्को - बुधवारी (दि.२४) संध्याकाळी साकवाळहून वास्को रेल्वे स्थानकावर येणाऱ्या मालवाहू रेल्वेच्या एका वॅगन (डबा) चे चाक घसरून रुळावरून बाहेर आले. मालगाडीचा एक डब्बा घसरून रुळाबाहेर आल्याने त्या रेल्वे मार्गावर अडथळा निर्माण झाल्याने वास्को रेल्वे स्थानकावरून पटना जाणारी वास्को - पटना एक्सप्रेस (१२७४१) प्रवासी रेल्वे सुमारे दोन तास उशिरा निघणार असल्याची माहीती मिळाली.

वास्को रेल्वे स्थानकावरील विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी ५ च्या सुमारास ती घटना घडली. वास्को रेल्वे स्थानकाच्या परिसरात रेल्वेचे काही काम चालू आहे. त्यासाठी रेल्वे रुळावर घालण्यात येणारी खडी (ब्लास्ट स्टोन) घेऊन एक मालगाडी (मालवाहू रेल्वे) वास्को रेल्वे स्थानकाच्या परिसरात येत होती. जेव्हा मालगाडी तानिया हॉटेल परिसराजवळ असलेल्या रेल्वे रुळावर पोचली त्यावेळी मालगाडीच्या एका डब्याचे चाक घसरून रेल्वे रुळाबाहेर आले. मालगाडीच्या वॅगनचे चाक रुळाबाहेर आल्याने तेथे अडथळा निर्माण झाला आहे. तो अडथळा दूर करण्याचे काम रेल्वे कामगार - कर्मचाऱ्यांनी सुरू केला आहे. बुधवारी रात्री ९ ते ९.३० पर्यंत रुळाबाहेर गेलेली मालगाडीचे वॅगन पुन्हा रुळावर आणण्यात येणार असल्याचा अंदाज आहे. सुमारे १५ वॅगन (डबे) सहीत येणाऱ्या मालगाडीचे एक वॅगन रुळाबाहेर जाऊन अडथळा निर्माण झाल्याने वास्को स्थानकावरून पटना जाण्यासाठी निघणारी प्रवासी रेल्वे अडथळा दूर केल्यानंतर उशिरा निघणार असल्याची माहीती मिळाली. वास्को - पटना एक्सप्रेस बुधवारी रात्री ७ वाजता निघते. घसरून रुळाबाहेर आलेले वॅगन तेथून हटविल्यानंतर नियमित वेळेपेक्षा वास्को - पटना एक्सप्रेस रेल्वे सुमारे दोन ते अडीच तास उशिरा रवाना होण्याचा अंदाज आहे. दरम्यान बुधवारी रात्री वास्कोहून बेंगलोर जाण्यासाठी यशवंतपूर एक्सप्रेस रेल्वे निघत असून त्या प्रवासी रेल्वेच्या निघण्याच्या वेळेपूर्वी रुळावरून घसरलेले वॅगन तेथून हटवण्यात येणार असल्याचा अंदाज असल्याने ती रेल्वे वेळेत निघणार असल्याची माहीती मिळाली.

टॅग्स :goaगोवाIndian Railwayभारतीय रेल्वे