पणजी बस्थानकात अग्नितांडव ! आरटोओ, कदंब कार्यालय भस्मसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 11:22 IST2017-10-02T11:21:36+5:302017-10-02T11:22:21+5:30

पणजी कदंब बस्थानकाला लागलेल्या आगीत कदंब महामंडळाचे कार्यालय, वाहतूक अधिका-यांचे कार्यालय आणि काही सुपर मार्केटचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

Goa: Fire breaks out at Kadamaba Transport Corporation (KTC) bus stand | पणजी बस्थानकात अग्नितांडव ! आरटोओ, कदंब कार्यालय भस्मसात

पणजी बस्थानकात अग्नितांडव ! आरटोओ, कदंब कार्यालय भस्मसात

पणजी : पणजी कदंब बस्थानकाला लागलेल्या आगीत कदंब महामंडळाचे कार्यालय, वाहतूक अधिका-यांचे कार्यालय आणि काही सुपर मार्केटचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  आगीत वाहतूक खात्याच्या कार्यालयाला सवार्धिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पहिल्या मजल्यावर असलेल्या या कार्यालयातील दस्तावेज, कागदपत्रे आणि फर्निचरही आगीत खाक झाले. सुपर मार्केटमधील सामानही जळून गेले तर कदंब महामंडळाच्या कार्यालयातील फाईल्सही आगीत खाक झाल्या आहेत. 

आग नेमकी किती वाजता लागली?, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सकाळी 6 वाजता अग्निशामक दलाला याबाबतची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान बंबसह दाखल झाले तेव्हा आग मोठ्या प्रमाणात भडकलेली होती. आगीचे आणि धुराचे उठलेले लोट दूरूनही दिसत होते.  आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला अथक मेहनत घ्यावी लागली. 
दरम्यान, आग कशामुळे लागली याचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.  


Web Title: Goa: Fire breaks out at Kadamaba Transport Corporation (KTC) bus stand

टॅग्स :Accidentअपघात