Goa Election 2022: युतीबाबत काँग्रेसशी आता चर्चा नाही; प्रफुल पटेल यांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 09:28 AM2022-01-19T09:28:08+5:302022-01-19T09:29:26+5:30

Goa Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेसची गोव्यात चांगल्या संख्येने उमेदवार देण्याची क्षमता असल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले.

goa election 2022 ncp praful patel clears that no more discussions with congress over alliance | Goa Election 2022: युतीबाबत काँग्रेसशी आता चर्चा नाही; प्रफुल पटेल यांनी स्पष्टच सांगितले

Goa Election 2022: युतीबाबत काँग्रेसशी आता चर्चा नाही; प्रफुल पटेल यांनी स्पष्टच सांगितले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

वास्को : गोव्यात काँग्रेसचे १५ आमदार त्यांना सोडून गेले असतानासुद्धा काँग्रेसला अजून ते स्वबळावर निवडणूक जिंकू शकतात, असे वाटते. काँग्रेसने आम्हाला जागा देण्याबाबत काहीच पावले उचलली नसल्याने यापुढे काँग्रेसशी युतीबाबत चर्चा करून काहीच उपयोग नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची गोव्यात चांगल्या संख्येने उमेदवार देण्याची क्षमता असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि माजी केंद्रीय विमान उड्डान मंत्री प्रफुल पटेल यांनी सांगितले.

मंगळवारी दुपारी दाबोळी विमानतळावर प्रफुल पटेल यांचे आगमन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस १९९९ सालापासून गोव्यात असून, आमचे आमदारही निवडून आले आहेत. येत्या निवडणुकीतही पुरेशा संख्येने उमेदवार देऊन ते निवडून आणू. एखाद्या समविचारी पक्षाला आमच्याशी युती करायची असल्यास त्यांचे स्वागत असल्याचे ते म्हणाले. प्रफुल पटेल यांच्या स्वागतासाठी दाबोळी विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा आणि इतर नेते उपस्थित होते.
 

Web Title: goa election 2022 ncp praful patel clears that no more discussions with congress over alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app