शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Goa Election 2022: गोव्याची संस्कृती, वारसा टिकवणार; तृणमूल काँग्रेसला विश्वास, भाजपवर जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 22:29 IST

Goa Election 2022: गोवा तृणमूल काँग्रेसने जाहीरनामा २०२२ प्रकाशित केल्यानंतर लगेचच  गोव्याची संस्कृती, वारसा आणि पर्यटन रक्षण करण्याच्या पक्षाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : गोवा तृणमूल काँग्रेसने जाहीरनामा २०२२ प्रकाशित केल्यानंतर लगेचच  गोव्याची संस्कृती, वारसा आणि पर्यटन रक्षण करण्याच्या पक्षाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. तृणमूलचे  राष्ट्रीय उपाध्यक्ष पवन वर्मा, गोवा प्रदेश उपाध्यक्ष शिवदास नाईक आणि सचिव आरमांदो  गोन्साल्विस यांनी गोव्याची सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण संस्कृती टिकवून ठेवण्याचे आश्वासन पणजीतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिले.

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने खेळलेल्या निर्णायक राजकारणावर टीका करताना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पवन वर्मा म्हणाले, ‘गोव्याला एक अद्वितीय संस्कृती आणि वारसा आहे. गोव्याची संस्कृती, गोव्याचा आत्मा, गोंयकारपण  यांचे वेगळेपण जपण्यासाठी संस्थात्मक पावले उचलण्याचा आमचा प्रस्ताव आहे. भाजपकडे सांस्कृतिक कीर्ती स्तंभांचे  मॉडेल आहे जे गोव्याच्या दोलायमान बहुलतेच्या विरोधात आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘काँग्रेसची संस्कृतीबद्दल संस्थात्मक उदासीनता आहे.’  वर्मा यांनी हिंदू धर्मावर भाजपची मक्तेदारी आहे का?, असा सवाल करतानाच सांगितले की, गोव्याच्या अस्मितेला धार्मिक विभाजन आणि द्वेषाच्या नजरेतून पाहिल्यास त्यावर मोठा आघात होईल. भाजपने सांस्कृतिक कीर्ती स्तंभाची कल्पना केली आहे. ते त्यांच्या अल्पकालीन राजकीय फायद्यासाठी हिंदू धर्माचा वापर करत आहेत. मात्र, ते स्वतः हिंदुत्ववादी नाहीत.’

गोव्यासाठी ‘टीएमसी’च्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार करताना वर्मा म्हणाले, ‘आमचा विश्वास आहे की, राजकारण येते आणि जाते, परंतु गोव्याची संस्कृती आणि आत्मा, सहअस्तित्व, बहुलता, सौहार्द, मैत्री आणि विश्वास, आदी टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याला वाढू देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.’ शिवदास नाईक म्हणाले, ‘मला हे घोषित करताना आनंद होत आहे की,  ‘टीएमसी’ने गोव्यातील सर्व वारसा स्थळांच्या जतन आणि देखभालीसाठी  २५ लाख रुपये निधी देण्याचे वचन दिले आहे. टीएमसी’ सत्तेत आल्यानंतर ‘हॉटस्पॉट्स’ ओळखून त्यांना पर्यटन स्थळांमध्ये विकसित करेल., असेही ते  म्हणाले. 

महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकताना आरमांदो  गोन्साल्विस म्हणाले, ‘गोव्याचे पर्यटन क्षेत्र हे कॅसिनो आणि बारच्या  समानार्थी बनले आहे, परंतु आपण आपले लक्ष गोमंतकीयांच्या तत्त्वज्ञानाच्या रक्षणाकडे वळवले पाहिजे. आम्ही गोवा वेल्हा आणि आगशी  हे क्षेत्र ‘सांस्कृतिक हॉटस्पॉट’ बनवू शकतो.’ 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Trinamool Congressतृणमूल काँग्रेस