ठरलं! जिल्हा पंचायत निवडणुका १३ डिसेंबरला, आचारसंहिता नोव्हेंबरच्या मध्यास, अधिसूचना जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 08:33 IST2025-10-15T08:33:23+5:302025-10-15T08:33:23+5:30
भाजपा युतीत निवडणुका लढवणार असून, आप स्वतंत्र आणि काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी चालवली आहे.

ठरलं! जिल्हा पंचायत निवडणुका १३ डिसेंबरला, आचारसंहिता नोव्हेंबरच्या मध्यास, अधिसूचना जारी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायतींच्या निवडणुका १३ डिसेंबर रोजी होणार आहेत. दोन्ही जिल्हा पंचायतींसाठी मिळून ५० मतदारसंघांमध्ये होणार असलेल्या या निवडणुकीसाठी नोव्हेंबरच्या मध्यास आचारसंहिता लागू होणार आहे.
पंचायत खात्याच्या सचिव चेस्ता यादव यांनी यासंबंधीची अधिसूचना काढली असून अर्ज भरण्याची तारीख, अर्ज मागे घेण्याची तारीख, मतदान कधी, मतमोजणी कधी असा निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग जाहीर करेल. आचारसंहितेसंबंधीची स्वतंत्र अधिसूचना नोव्हेंबरमध्ये येणार आहे. पक्षीय पातळीवर या निवडणुका होणार असल्याने सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. जिल्हा पंचायतींचा कार्यकाळ ७ जानेवारी २०२६ रोजी संपत आहे. त्याआधी निवडणुका घेणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे आयोग आधीच कामाला लागला होता.
गेल्या महिन्यात मतदारसंघ सीमांकन मसुदा जनतेसाठी खुला करून आयोगाने जनतेच्या हरकती व सूचना मागवल्या. जिल्हाधिकारी आणि संबंधित निवडणूक अधिकारी, मामलेदारांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत २६ सप्टेंबरपर्यंत तो उपलब्ध केला होता. २५ डिसेंबरनंतर नाताळ व नववर्षाची धूम राज्यभर सुरू होते. यावेळी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पर्तगाल मठाचा ५५०वा वर्धापनदिन सोहळाही होणार आहे. ३० नोव्हेंबर रोजी या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळे डिसेंबरच्या मध्यास निवडणूक घेण्याचा निर्णय झाला.
या प्रतिनिधीने मिनीन यांच्याशी संपर्क साधला असता बुधवारी आपण या पदाचा ताबा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मिनीन हे गोमंतकीय अधिकारी असून, गोवा सरकारच्या नागरी सेवेत त्यांनी पंचायत संचालक, पर्यटन संचालक, अबकारी आयुक्त आदी आयएएस अधिकारी म्हणून बढती महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मिळाल्यानंतरही ते गोव्यातच होते.
मिनीन डिसोझा नवे राज्य निवडणूक आयुक्त
दरम्यान, सरकारने निवृत्त आयएएस अधिकारी मिनीन डिसोझा यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. पंचायत संचालक महादेव आरोंदेकर यांनी हा आदेश काढला. दौलतराव हवालदार यांचा कार्यकाळ संपल्याने ने पट रिक्त झाले होते.
पक्षीय सद्यःस्थिती
दक्षिण व उत्तर गोवा जिल्हा पंचायत मतदारसंघात प्रत्येकी २५ मतदारसंघ आहेत. सध्या दोन्ही जिल्हा पंचायती भाजपकडे आहेत. येत्या जि. पं. निवडणुकीत भाजप व मगो सोबत असतील, असे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. विरोधकांमध्ये आप स्वतंत्रपणे ही निवडणूक लढणार आहे. काँग्रेसनेही स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी चालवली आहे.