पूजा शर्माला चौकशीला यायला वेळ नाही; तारीख बदलून देण्याची पोलिसांकडे मागणी

By वासुदेव.पागी | Updated: June 30, 2024 17:19 IST2024-06-30T17:17:14+5:302024-06-30T17:19:43+5:30

Goa Crime : आसागाव मोडतोड प्रकरण हाणझुणे पोलिसांकडून क्राईम ब्रँचला सोपविण्यात आल्यानंतर या प्रकरणातील तपासने वेग घेतला आहे.

Goa Crime Pooja Sharma prime suspect in house demolition case, has been summoned by the police | पूजा शर्माला चौकशीला यायला वेळ नाही; तारीख बदलून देण्याची पोलिसांकडे मागणी

पूजा शर्माला चौकशीला यायला वेळ नाही; तारीख बदलून देण्याची पोलिसांकडे मागणी

पणजी: तासगाव येथील घराच्या मोडतोड प्रकरणात मुख्य संशयित असलेली पूजा शर्मा हिला पोलिसांनी १ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावली असले तरी त्यादिवशी ती व्यस्त असल्यामुळे वेळ बदलून घेण्याची मागणी तिने केली आहे. 

आसागाव मोडतोड प्रकरण हाणझुणे पोलिसांकडून क्राईम ब्रँचला सोपविण्यात आल्यानंतर या प्रकरणातील तपासने वेग घेतला आहे. क्राईम ब्रँच कडून या प्रकरणात विशेष तपास पथकही (एसआयटी) बनवली आहे. एसआयटीने पूजा शर्मा हिला १ जुलै रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी  बजावले होते . मात्र या प्रकरणात पूजा शर्मा हिने पोलिसांना दिलेल्या पत्रात तिला त्या पासाची वेळ बदलून देण्याची मागणी करण्यात आली आहे. कारण एक जुलै रोजी ती इतर कामात व्यस्त आहे असे तिने एसआयटी ला कळविली आहे. एक जुलै ऐवजी आणखी दुसरी कोणतीही तारीख द्यावी अशी मागणी तिने एसआयटी कडे केली आहे. 

पूजा शर्मा ही या प्रकरणातील मुख्य संशयित आहे. तिच्यात सूचनेवरून बाउन्सरने ते वादग्रस्त घर पाडले होते. पूजा शर्मा हिला तिच्या व्यस्त तिच्या कारणामुळे उपस्थित राहण्यास शक्य होणार नसल्याचे शर्मा हिने सांगितले असले तरी त्यांना तारीख बदलून देण्यात येईल का हाच मुद्दा बहुचर्चित आहे

Web Title: Goa Crime Pooja Sharma prime suspect in house demolition case, has been summoned by the police