शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

मुख्यमंत्री दिल्लीला रवाना; भाजपा अध्यक्षांना भेटण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 13:11 IST

मुख्यमंत्री शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी गोव्यात परतणार

पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे बुधवारी रात्री उशिरा दिल्लीस रवाना झाले. मुख्यमंत्र्यांकडून दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली जाण्याची दाट शक्यता आहे.मुख्यमंत्री खूप दिवसांनंतर दिल्लीला गेले आहेत. शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी ते गोव्यात परततील. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी पणजीतील पदयात्रेत भाग घेतला. गांधी जयंती सोहळ्यात सहभाग घेतला. त्यानंतर ते दिल्लीस रवाना झाले. ते दिल्लीला जात असल्याची कल्पना अन्य मंत्र्यांना नव्हती. मात्र मुख्यमंत्र्यांची भेट अचानक ठरली नाही. ती पूर्वनियोजितच होती. लोकमतने मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला असता, मुख्यमंत्री म्हणाले की जागतिक आर्थिक फोरमच्या बैठकीनिमित्ताने आपण दिल्लीस आलो. आणखी कुणाला आपण भेटावे ते अजून ठरलेले नाही.दरम्यान, भाजपच्या आतील गोटातून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री दिल्लीत शहा यांची भेट घेतील. अलिकडेच गोव्यात नोकर भरतीच्या विषयावरून वाद निर्माण झाला. मुख्यमंत्र्यांनी क वर्गातील सगळी नोकर भरती राज्य निवड आयोगामार्फतच होईल अशी भूमिका घेतली व यामुळे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांना धक्का बसला. कारण आरोग्य खात्याने शेकडो पदे भरण्यासाठी प्रक्रिया आरंभली होती. नोकर भरतीतील आरोग्य मंत्र्यांचे अधिकार कमी झाले. त्यानंतर मंत्री राणे अस्वस्थ झाले व त्यांनी दिल्ली गाठली. त्यांनी तिथे अमित शहा यांची भेट घेतली. आपण शहा यांना भेटल्याचा पुरावा म्हणून राणो यांनी फोटोही प्रसार माध्यमांना पाठवून दिला. मुख्यमंत्री सावंत हे या सगळ्य़ा पाश्र्वभूमीवर अलिकडे दिल्लीला पोहचले नव्हते. आता त्यांना संधी मिळाल्याने ते शहा यांची भेट घेऊनच परततील व त्यांच्यासमोर नोकर भरतीचा विषय मांडतील असे पक्ष सुत्रांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतAmit Shahअमित शहाBJPभाजपा