Goa Chief Minister Pramod Sawant's 'Morning Walk' with cm devendra Fadnavis in Mumbai | गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’ 
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’ 

पणजी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रचार दौऱ्यावर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी मुंबईत मरिन ड्राइव्ह येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’ करीत प्रचार केला. 

प्रमोद सावंत हे निवडणूक प्रचारासाठी सध्या मुंबईत आहे. मरिन ड्राइव्ह येथे ट्रायडन्ट हॉटेलच्यासमोर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’ करताना त्यांनी लोकांशी संवाद साधला. त्यानंतर व्टीट करताना सावंत म्हणतात की, ‘लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर स्फूर्तीदायक वातावरण दिसून आले.’

‘मुंबई चली भाजपा के साथ’असेही ट्विटरवर म्हणताना फडणवीस यांच्यासोबत केलेल्या ‘मॉर्निंग वॉक’चा फोटोही शेअर केला आहे. 

गोव्याचे अनेक भाजप मंत्री निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्रात आहेत. बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी आज सकाळी बांदा, सिंधुदुर्ग येथे प्रचारार्थ ‘रोड शो’मध्ये भाग घेतला. समाजकल्याणमंत्री मिलिंद नाईक पनवेल येथे प्रचारकार्यात भाग घेणार आहेत. जाहीर प्रचार संपेपर्यंत १९ तारीखपर्यंत गोव्याचे भाजप मंत्री, आमदार, पदाधिकारी महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. 


Web Title: Goa Chief Minister Pramod Sawant's 'Morning Walk' with cm devendra Fadnavis in Mumbai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.