गोव्याचे संघ प्रचारक मुंबईत अपघातात ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 21:43 IST2017-11-02T21:43:33+5:302017-11-02T21:43:37+5:30
पणजी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उत्तर गोव्याचे प्रचारक प्रशांत ताठे यांचे मुंबईत अपघाती निधन झाले. आई आजारी असल्यामुळे दोन दिवसांपूर्वीच ते मुंबईला गेले होते.

गोव्याचे संघ प्रचारक मुंबईत अपघातात ठार
पणजी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उत्तर गोव्याचे प्रचारक प्रशांत ताठे यांचे मुंबईत अपघाती निधन झाले. आई आजारी असल्यामुळे दोन दिवसांपूर्वीच ते मुंबईला गेले होते.
ताठे हे महाराष्ट्रातील बदलापूर येथील होते व गेली तीन वर्षे उत्तर गोव्याचे प्रचारक म्हणून काम पाहत होते. त्यांच्या प्रचारकी जीवनाची सुरुवातच गोव्यात झाली होती. त्यांची प्रचारकी कारकीर्द ही उल्लेखनीय असल्याचे संघाचे ज्येष्ठ नेते सांगतात. मुख्य म्हणजे त्यांचा स्वयंसेवकांशी संपर्क दांडगा होता. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. मुंबईतील कर्जत पोलीस स्थानकातून या अपघाताची माहिती देणारा फोन गोव्यातील कार्यकर्त्यांना आला होता. ते ३२ वर्षे वयाचे होते.