शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

गोव्याचा अर्थसंकल्प गुरुवारी मंत्री ढवळीकर मांडणार, अधिवेशनाला फक्त तीन दिवस शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 4:24 PM

गोव्याचा 2018-19 सालासाठीचा अर्थसंकल्प येत्या गुरुवारी बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते सभागृहात मांडला जाणार आहे.

पणजी : गोव्याचा 2018-19 सालासाठीचा अर्थसंकल्प येत्या गुरुवारी बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते सभागृहात मांडला जाणार आहे. विधानसभा अधिवेशनाचे कामकाज चार दिवसांपुरते मर्यादित ठेवण्यात आले असून, आता फक्त तीन दिवस शिल्लक आहेत.मंत्री ढवळीकर हे अर्थसंकल्प वाचून दाखवणार नाहीत. ते फक्त अर्थसंकल्पाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवतील. राज्याचा अर्थसंकल्प सभागृहाच्या पटलावर केवळ ठेवण्याची वेळ प्रथमच येत आहे.पाच महिन्यांसाठी लेखानुदान मंजूर करून घेतले जाणार आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी प्रारंभ झाला. सोमवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत. ते चार दिवसांच्या अधिवेशनाला येणार नाहीत. कारण मुंबईतील लीलावती इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे नेते म्हणून मगो पक्षाचे नेते असलेले मंत्री ढवळीकर हे सत्ताधा-यांच्या वतीने काम पाहतील. भाजपानेही तसेच जाहीर केले व मंत्री ढवळीकर यांनीही तसेच पत्रकारांना सांगितले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी अभिभाषण सादर केले. त्यानंतर सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी उद्या मंगळवारपर्यंत विधानसभा कामकाज तहकूब केले जात असल्याचे स्पष्ट केले. तत्पूर्वी सभापतींनी मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी माहिती दिली. कुणीच अफवांवर विश्वास ठेवू नये. मुख्यमंत्री उपचारांना प्रतिसाद देत असून ते लवकर बरे होऊन यावेत, अशी प्रार्थना आम्ही करू या असे निवेदन केले.दुपारी सभापतींनी विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची (बीएसी) बैठक घेतली. मंत्री सुदिन ढवळीकर, विजय सरदेसाई, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर आदींनी या बैठकीत भाग घेतला. विधानसभेचे कामकाज पूर्वी 22 मार्चपर्यंत चालवावे असे ठरले होते. तथापि मुख्यमंत्री आजारी असल्याने केवळ चारच दिवस कामकाज ठेवू या असे बैठकीत ठरले. गुरुवारी 22 रोजी मंत्री ढवळीकर यांनी अर्थसंकल्प मांडावा असेही ठरले. वर्षाला जेवढे दिवस विधानसभेचे कामकाज व्हावे असे नियमानुसार अपेक्षित आहे, तेवढे दिवस ते व्हायला हवे, अशी भूमिका कवळेकर यांनी मांडली आहे.सोमवारी दिवसभर अनेक बैठका झाल्या. सकाळी भाजपाच्या आमदारांची बैठक झाली व त्या बैठकीवेळी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या आरोग्याविषयीची माहिती आमदारांना देण्यात आली. ते अधिवेशनाला येऊ शकणार नाहीत याचीही कल्पना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपप्रणीत सत्ताधारी आघाडीचीही बैठक सोमवारी पार पडली. ढवळीकर हे सभागृहात नेते म्हणून काम पार पाडतील हे त्यावेळी मान्य केले गेले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पत्रकारांना सांगितले, की ढवळीकर हे पर्रीकर मंत्रिमंडळातील दुस-या क्रमांकाचे मंत्री आहेत. त्यामुळे पुढील तीन दिवस अधिवेशनात तेच सभागृहाचे नेते असतील. भाजपाचे विधिमंडळ गटनेते म्हणून मात्र मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे काम पाहणार आहेत.फाईल्स ढवळीकरांकडेदरम्यान, आपण प्रभारी मुख्यमंत्री नव्हे पण मुख्यमंत्र्यांकडे एरव्ही ज्या फाईल्स जायला हव्यात, त्या सगळ्या फाईल्स पर्रीकर यांच्या अनुपस्थितीमुळे आता आपल्याकडे येतील, असे मंत्री ढवळीकर यांनी सोमवारी अधिवेशनातील पहिल्या दिवसाच्या कामकाजानंतर पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :goaगोवा