भाजपकडून दहा जणांची हकालपट्टी; पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 10:04 IST2025-12-16T10:04:14+5:302025-12-16T10:04:14+5:30
निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून भाजपने दहा जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

भाजपकडून दहा जणांची हकालपट्टी; पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून भाजपने दहा जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
यात उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष कार्तिक कुडणेकर (सुकूर) तसेच दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्षा संजना वेळीप व तिचे पती संजय वेळीप (गिरदोली) यांचा समावेश आहे. वेळीप दाम्पत्याने काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
पक्षातून हकालपट्टी केलेल्या इतरांमध्ये भावना नाईक (शिरोडा), आतिश गांवकर (धारबांदोडा), सुधा गांवकर (सावर्डे), विपीन प्रभुगांवकर (पैंगीण) अच्युत प्रकाश नाईक (सांकवाळ), राजेश शेट्टी (सांकवाळ) व शिवा सुरेश चोडणकर यांचा समावेश आहे.