बिग डॅडी स्ट्राईक कॅसिनोवर छापा, ११ अटकेत

By वासुदेव.पागी | Updated: June 16, 2024 17:39 IST2024-06-16T17:38:53+5:302024-06-16T17:39:47+5:30

बांबोळी येथील बिग डॅडीच्या स्ट्राईक कॅसिनोत बेकायदा पत्त्याचा जुगार सुरु असल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती

Goa Big Daddy Strike Casino Raid 11 Arrests | बिग डॅडी स्ट्राईक कॅसिनोवर छापा, ११ अटकेत

बिग डॅडी स्ट्राईक कॅसिनोवर छापा, ११ अटकेत

पणजी: गुन्हा अन्वेेषण विभागाकडून  बांबोळी येथे बिग डॅडीच्या स्ट्राईक  कॅसिनोतील बेकायदा पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत  ११ जणांना अटक करण्यात आली तर २८ लाख रुपये किमतीचे चिप्स आणि इतर साहित्य मिळून ३३ लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. 
 
बांबोळी येथील बिग डॅडीच्या स्ट्राईक कॅसिनोत बेकायदा पत्त्याचा जुगार सुरु असल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती.  त्यानुसार व्यवस्थित नियोजन करून पोलीस पथकाने शनिवार १५ रोजी रात्री ११.५० ते १६ रोजी मध्यरात्री १.४५ वाजता हा छापा टाकला.  यावेळी   दोन टेबलवर पत्त्याचा जुगार होता असेही सांगण्यात आले. निरीक्षक किशोर रामानन यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.  

अटक करण्यात आलेल्यात एक व्यवस्थापक, दोन कर्मचाऱ्यासह जुगार खेळणारे ८ जण मिळून ११ जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडून पथकाने दोन टेबल, १४ टॅबलेट्स, पत्ते, २ लाइव्ह कार्ड शफलर्स, ०२ कार्ड स्कॅनर, २८ लाख रुपयांची चिप्स आणि इतर जुगार साहित्य मिळून ३३ लाख रुपये किमतीचे जुगार ऐवज जप्त केला. त्यानंतर  संशयितांची प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर सुटका करण्यात
आल्याची माहितीही देण्यात आली.

Web Title: Goa Big Daddy Strike Casino Raid 11 Arrests