Goa Assembly Election Result: उत्पल पर्रीकरांना पराभूत करणारे भाजप नेते स्वपक्षावरच नाराज; वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 17:16 IST2022-03-10T17:16:12+5:302022-03-10T17:16:52+5:30
Goa Assembly Election Result: अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर पणजीत भाजप उमेदवाराकडून पराभूत; पण तरीही भाजप उमेदवार नाराज

Goa Assembly Election Result: उत्पल पर्रीकरांना पराभूत करणारे भाजप नेते स्वपक्षावरच नाराज; वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातलं
पणजी: गोव्यात भाजपनं सत्ता राखली आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत. यापैकी २० जागांवर भाजपनं आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसचे उमेदवार १२ मतदारसंघांत आघाडीवर आहेत. भाजपचे दिवंगत नेते आणि माजी संरक्षणमंत्री उत्पल पर्रीकर पणजी मतदारसंघातून लढत होते. भाजपचे उमेदवार बाबुश मॉन्सेरात यांनी उत्पल पर्रीकरांचा पराभव केला.
बाबुश मॉन्सेरात यांचा पणजीमध्ये निसटता विजय झाला आहे. अपक्ष उमेदवार असूनही उत्पल यांनी मॉन्सेरात यांना कडवी लढत दिली. मॉन्सेरात यांनी विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांबद्दल नाराजी बोलून दाखवली. आपल्याला मिळालेलं मताधिक्य समाधानकारक नसल्याचं मॉन्सेरात म्हणाले. अनेक भाजप कार्यकार्त्यांनी आपल्याला मतदान न केल्याचा दावा त्यांनी केला.
'मी ही बाब भाजप नेत्यांच्या कानावर घातली आहे. त्यांनी भविष्यात ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. राज्य भाजपनं लोकांपर्यंत योग्य संदेश पोहोचवला नाही. मी भाजपच्या सर्व नेत्यांच्या संपर्कात आहे आणि मी भाजपसोबत आहे,' असं मॉन्सेरात म्हणाले.
मनोहर पर्रीकर पणजी मतदारसंघातून निवडून यायचे. त्यामुळे उत्पल यांनी याच मतदारसंघाचा आग्रह धरला. मात्र पक्षानं तिथून मॉन्सेरात यांना उमेदवारी दिली. उत्पल यांना पक्षानं दुसऱ्या पक्षातून उमेदवारी देण्याची तयारी केली होती. मात्र उत्पल यांनी पणजीचा आग्रह कायम ठेवत अपक्ष निवडणूक लढवली.