शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Goa: सांगेत पक्षविरोधी कारवायांच्या आरोपांवरुन सुभाष फळदेसाई व कवळेकर यांच्यात जुंपली

By किशोर कुबल | Updated: May 9, 2024 16:12 IST

Goa Assembly Election 2024: बाबू कवळेकर यांचे कर्मचारी तसेच त्यांची पत्नी सावित्री यांचे निकटचे कार्यकर्ते सांगे मतदारसंघात कॉंग्रेसी उमेदवाराच्या विजयासाठी वावरले. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे बजावूनही भाजपविरोधात त्यानी काम केले, असा खळबळजनक आरोप समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी केला.

- किशोर कुबल पणजी - सांगेत पक्षविरोधी कारवायांच्या आरोपांवरुन मंत्री सुभाष फळदेसाई व माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर तसेच त्यांची पत्नी सावित्री यांच्यात बरीच जुंपली आहे.बाबू कवळेकर यांचे कर्मचारी तसेच त्यांची पत्नी सावित्री यांचे निकटचे कार्यकर्ते सांगे मतदारसंघात कॉंग्रेसी उमेदवाराच्या विजयासाठी वावरले. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे बजावूनही भाजपविरोधात त्यानी काम केले, असा खळबळजनक आरोप समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी केला.

माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी या आरोपांना तात्काळ प्रत्युत्तर दिले. ते  म्हणाले कि, ‘ पक्षाप्रती माझी निष्ठा आणि वचनबध्दता पक्ष नेतृत्त्वाला तसेच तमाम गोवकरांना ठाऊक आहे. फळदेसाई यांना माझी निष्ठा किंवा पत यावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार नाही. हताश व बोगस व्यक्तीकडून मला दाखल्याची गरज नाही.’ ते पुढे म्हणाले कि,‘ केपें मतदारसंघात कॉग्रेसचा आमदार आहे असे असूनही भाजपला तेथे मताधिक्क्य मिळेल.

माझे नाव नाहक गोवण्याचा प्रयत्न-   निकालातून सर्व काही स्पष्ट होईलचफळदेसाई हे नाहक माझे नाव घेऊन अपप्रचार करीत आहेत, असे सावित्री कवळेकर यांचे म्हणणे आहे. त्या म्हणाल्या की, ‘ या निवडणुकीत मी दिलेल्या योगदानाची पक्षाला बय्रापैकी कल्पना आहे. दक्षिण गोव्याची जागा भाजप उमेदवाराने जिंकावी यासाठी मी परिश्रम घेतलेले आहेत त्यामुळे फळदेसाई यांनी केलेल्या निरर्थक आरोपांना मी स्पष्टिकरण देण्याची गरज नाही. निकालात काय ते स्पष्ट दिसून येईलच. फळदेसाई हे माझे नाव नाहक गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पक्ष नेतृत्त्वाने याची गंभीर दखल घ्यायला हवी.’

टॅग्स :goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४