गोवा : अज्ञाताने पर्वरीत कार्यक्रमाचे फलक फाडल्याने संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 18:30 IST2024-01-19T18:30:03+5:302024-01-19T18:30:17+5:30

अयोध्येत होणाऱ्या श्रीराम प्रतिष्ठापनेनिमित्त पर्वरी परिसरात श्रीराम कार्यक्रमाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

Goa Anger after unknown person tore down the board of the program | गोवा : अज्ञाताने पर्वरीत कार्यक्रमाचे फलक फाडल्याने संताप

गोवा : अज्ञाताने पर्वरीत कार्यक्रमाचे फलक फाडल्याने संताप

पर्वरी : अयोध्येत होणाऱ्या श्रीराम प्रतिष्ठापनेनिमित्त पर्वरी परिसरात श्रीराम कार्यक्रमाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. शुक्रवारी (दि. १९) एका अज्ञात व्यक्तीने  येथील मॉल दी गोवासमोर आणि चोगम मार्गावरसह इतर दोन ठिकाणी फलक फाडल्याचा प्रकार उघडकीस आला.

याबाबत पिळर्ण पंचायतीचे उपसरपंच अजय गोवेकर यांनी पर्वरी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तपासावेळी संशयित कळंगुटमार्गे चालत जात असताना दिसला आहे. पोलिस संशयिताचा शोध घेत आहे. पोलिस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंदार परब तपास करीत आहेत.

Web Title: Goa Anger after unknown person tore down the board of the program