Goa: क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान खुनात
By आप्पा बुवा | Updated: June 12, 2023 19:30 IST2023-06-12T19:30:42+5:302023-06-12T19:30:58+5:30
Goa Crime News: उजगाव येथील एका अंळबी पैदास केंद्रात दोन कामगारांमध्ये झालेल्या क्षुल्लक बाचाबाची चे पर्यावसन एका कामगाराच्या संशयास्पद मृत्यूत झाले आहे.

Goa: क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान खुनात
- अप्पा बुवा
फोंडा- उजगाव येथील एका अंळबी पैदास केंद्रात दोन कामगारांमध्ये झालेल्या क्षुल्लक बाचाबाची चे पर्यावसन एका कामगाराच्या संशयास्पद मृत्यूत झाले आहे.
सविस्तर वृत्तानुसार उजगाव येथील ट्राॅपिकल मशरूम ह्या आळंबी पैदास केंद्रात बिहारचे काही कामगार काम करतात. शनिवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान चुम्मन कुमार व आणखी दोन कामगारांमध्ये भांडण चालू होते. सदरचे भांडण संपल्यावर त सदर कामगाराने राजेंद्र सहा (वय 35 मूळ बिहार) यांच्याशी वाद उरकून काढला. त्यावेळी झालेल्या झटपटीत एक धारदार वस्तू राजेंद्र ह्या कामगाराला लागली. सदर वस्तू लागताच राजेंद्र हा जबर जखमी झाला . रक्तबंबाळ अवस्थेत त्याला गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्याचे निधन झाले. राजेंद्र च्या मृत्यूची बातमी समजतात पोलिसांनी चूम्मन कुमारला या संशयताला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.