शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Goa: गोव्यात सहकाऱ्याचा खून प्रकरणी आरोप दोषीला पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

By सूरज.नाईकपवार | Updated: May 27, 2024 20:47 IST

Goa News: आपलाच सहकारी सुफल शर्मा (२९) याचा खून केल्या प्रकरणात दोषी ठरलेला आरोपी शुभंकर जना याला न्यायालयान पाच वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. त्याला न्यायालयाने भादंसच्या ३०४ कलमाखाली दोषी ठरविताना वरील शिक्षा सुनावली तसेच ५० हजारांचा दंडही फर्माविला.

- सूरज नाईकपवारमडगाव -आपलाच सहकारी सुफल शर्मा (२९) याचा खून केल्या प्रकरणात दोषी ठरलेला आरोपी शुभंकर जना याला न्यायालयान पाच वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. त्याला न्यायालयाने भादंसच्या ३०४ कलमाखाली दोषी ठरविताना वरील शिक्षा सुनावली तसेच ५० हजारांचा दंडही फर्माविला. गोव्यातील दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष इर्शाद आगा यांच्या न्यायालयाने वरील निवाडा दिला. ११ जून २०२१ साली माजोर्डा येथे खुनाची वरील घटना घडली होती. आरोपी व मयत हे दोघेही मूळ पश्चिम बंगाल राज्यातील आहेत. खुनाची ही घटना माजोर्डा रेल्वे स्थानकाजवळ घडली होती. ते दाेघेही सुतार होते व पी. डिसोझा यांच्या फर्निचर दुकानात कामाला होता.

दारुच्या नशेत दोघामध्ये खटके उडून त्याची परिणती भांडणात झाली होती. शुभंकरनें सुफलवर लाकडी दंडुक्याने वार केला होता नंतर चाकूने हल्ला चढवून त्याला जखमी केले होते. ही घटना कोलवा पोलिसांना कळाल्यानंतर जखमी अवस्थेत सुफलला येथील हॉस्पिसियो इस्पितळात दाखल केले होते. मात्र मागाहून त्याला मरण आले होते.कोलवा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी या प्रकरणाचा तपास करताना शुभंकरला अटक केली होती.

न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठाविताना दंडाची रक्कम मयताचा भाउ गोपाल याला देण्यास सांगितली आहे. दंंड न भरल्यास त्याला एका वर्षाची साधी कैदही भोगावी लागेल. आरोपी सदया कोलावळ तुरुंगात असून, त्याने आतापर्यंत कोठडीत घालविलेल्या काळ शिक्षेतून वजा करण्यात येणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयgoaगोवा