गोवा : समुद्रकिनाऱ्यावर बॉयफ्रेंडसमोर तरुणीवर सामूहिक बलात्कार, दोघांचे काढले न्यूड फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 18:04 IST2018-05-26T16:03:27+5:302018-05-26T18:04:49+5:30

गोव्यातील एका समुद्रकिनाऱ्यावर मित्रासोबत आलेल्या एका 20 वर्षीय युवतीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. 

Girl Gang raped by three tourists in Goa | गोवा : समुद्रकिनाऱ्यावर बॉयफ्रेंडसमोर तरुणीवर सामूहिक बलात्कार, दोघांचे काढले न्यूड फोटो

गोवा : समुद्रकिनाऱ्यावर बॉयफ्रेंडसमोर तरुणीवर सामूहिक बलात्कार, दोघांचे काढले न्यूड फोटो

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव - गोव्यातील एका समुद्रकिनाऱ्यावर मित्रासोबत आलेल्या एका 20 वर्षीय युवतीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मडगावपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या बेताळभाटी बीचवर ही घटना घडली आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना कोलवा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हे तिन्ही संशयित मध्य प्रदेश येथील असून पर्यटनासाठी ते गोव्यात आलेले असताना त्यांनी तरुणीवर बलात्कार केला. 24 मे रोजी ही घटना आहे. 

गोव्यातीलच एक प्रेमी युगुल गुरुवारी सायंकाळी ‘सनसेट बीच’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेताळभाटी येथील या बीचवर आले होते. सदर बीचवर त्यावेळी आणखी एक दाम्पत्य होते. मात्र काही वेळानंतर ते दाम्पत्य उठून गेले. मात्र हे प्रेमी युगुल तेथेच होते. सदर बीच निर्जन  असून रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास ते परतण्याच्या तयारीत असताना हे तीन संशयित त्यांच्याकडे आले. सुरुवातीला त्यांनी त्यांच्याकडून पैसे मागितले. मात्र त्या युवतीच्या मित्राकडे केवळ 200 रुपयेच होते. या युगुलाकडून आणखी पैसे काढून घेण्यासाठी त्यांना त्या तिघांनी या बीचवरच्या झाडीच्या भागात नेले. तिथे त्या दोघांच्या अंगावरील कपडे काढून त्यांचे व्हिडीओ शुटिंग केले व त्यानंतर त्या तिघांनी तिच्यावर बलात्कारही केला.

रात्री उशिरा त्या दोघांनी कोलवा पोलीस स्थानक गाठत तक्रार दिल्यानंतर तातडीने चौकशी सूत्रे हलली. शुक्रवारी रात्रीपर्यंत पोलिसांनी या तिघांपैकी एकाला मडगाव रेल्वे स्थानकावर तर दुस-याला करमळी रेल्वे स्थानकावर अटक केली. तर तिसरा संशयित शनिवारी सकाळी पोलिसांच्या हाती लागला. दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हे तिन्ही युवक पर्यटक म्हणून गोव्यात आले होते. ते कोलवा येथे एका हॉटेलात उतरले होते. कोलव्याजवळच बेताळभाटी बीच असून गुरुवारी सायंकाळी ते तिथे गेले असता त्यांच्या तावडीत युवती सापडली. सुरुवातीला पैशासाठी त्यांनी त्या दोघांना अडविले. मात्र नंतर शारीरिक आकर्षणातून हा बलात्कार करण्याचा प्रकार घडला.

 

Web Title: Girl Gang raped by three tourists in Goa