शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

खाणमालकांकडून ३५ हजार ७८० कोटी येणे

By admin | Updated: May 27, 2014 01:36 IST

पणजी : गोवा सरकारला खनिज व्यावसायिकांकडून १२ टक्के व्याजदराने एकूण ३५ हजार ७८० कोटी रुपये येणे आहेत. तशा प्रकारचा हिशेब मांडून सविस्तर माहिती गोवा

पणजी : गोवा सरकारला खनिज व्यावसायिकांकडून १२ टक्के व्याजदराने एकूण ३५ हजार ७८० कोटी रुपये येणे आहेत. तशा प्रकारचा हिशेब मांडून सविस्तर माहिती गोवा फाउंडेशनचे संचालक डॉ. क्लॉड अल्वारिस यांनी सरकारच्या मुख्य सचिवांना पाठवली आहे. दि. २१ नोव्हेंबर २००७ ते दि. १० सप्टेंबर २०१२ या काळात गोव्यात सर्व लिज क्षेत्रांमध्ये बेकायदा पद्धतीने खनिज व्यवसाय चालला हे सर्वोच्च न्यायालयाने २१ एप्रिल २०१४ रोजी दिलेल्या निवाड्यातून स्पष्ट केले आहे. या कालावधीत ज्यांनी खनिज व्यवसाय केला, त्यांच्याकडून सरकारने २५ हजार १४९ कोटी रुपये वसूल करणे बंधनकारक ठरत आहे. यावर १२ टक्के व्याज दर लागू करून सरकारला एकूण ३५ हजार ७८० कोटी रुपये वसूल करावे लागतील. यासाठी गोवा फाउंडेशनकडून सरकारला कोणतेही सहकार्य हवे असल्यास ते करण्यास आम्ही तयार आहोत, असे अल्वारिस यांनी नमूद केले आहे. २०१२-१३ साली खनिजाची जी किंमत होती त्यावरून अल्वारिस यांनी तपशीलवार हिशेब मांडून त्याबाबतचा अभ्यासपूर्ण तक्ता मुख्य सचिवांना सादर केला आहे. पाच वर्षे पूर्ण खनिज व्यवसाय गोव्यात बेकायदा पद्धतीने चालला हे न्यायालयीन निवाड्यातून स्पष्ट झाले आहे. सेसा गोवा कंपनीकडून गोव्यात सर्वाधिक खनिज माल काढला जातो व सर्वाधिक मालाची निर्यात केली जाते. हे प्रमाण ३० टक्के आहे. सेसा गोवाचा ७४ टक्के खनिज व्यवसाय एका गोवा राज्यात आहे. गोवा खनिज निर्यातदार संघटनेकडील आकडेवारीवरून आम्ही विविध कंपन्यांच्या खनिज निर्यातीचे प्रमाण निश्चित केले आहे. सरकारकडे वसुलीसाठी तपास व खटले भरण्याचे काम करणारा स्वतंत्र विभाग असणे गरजेचे आहे, असे अल्वारिस यांनी म्हटले आहे. बेकायदा खनिज व्यवसायात सहभागी झालेल्या कुठल्याच कंपनीला तिची मालमत्ता विकण्यास दिली जाऊ नये किंवा मालमत्तेवर अन्य कुणाला कब्जा करण्यास दिला जाऊ नये, असेही अल्वारिस यांनी म्हटले आहे. वसुलीबाबत जो कुणी माहिती देईल, त्यास कायदेशीर पद्धतीने पुरस्कार द्यावा आणि व्हिसलब्लोअर कायदा अस्तित्वात आणण्याचा विचार केला जावा. खनिज व्यावसायिकांबाबतचे वसुलीचे खटले लवकर निकालात निघावेत म्हणून विशेष न्यायालय स्थापन केले जावे, असेही अल्वारिस यांना वाटते. (खास प्रतिनिधी)